________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
I
(सूत्र) द्वितीय - तुर्ययोरुपरि पूर्व: ।। ९०।। (वृत्ति) द्वितीयतुर्य योर्द्वित्वप्रसंगे उपरि पूर्वौ भवतः । द्वितीयस्योपरि प्रथमश्चतुर्थस्योपरि तृतीय इत्यर्थः । शेष । वक्खाणंः। वग्घो। मुच्छा। निज्झरो। कट्ठं। तित्थं। निद्धणो । गुप्फं । निब्भरो। आदेश । जक्खो । घस्य नास्ति। अच्छी। मज्झं । पट्ठी । वुड्ढो । हत्थो। आलिद्धो। पुप्फं । भिब्भलो। तैलादौ (२.९८) द्वित्वे ओक्खलं । सेवादौ (२.९९) नक्खा'। नहा। समासे । कइ-द्धओ कइ - धओ । द्वित्व इत्येव । खाओ।
१५१
(अनु.) ( वर्गीय व्यंजनांपैकी) द्वितीय आणि चतुर्थ व्यंजनांच्या द्वित्वाचा प्रसंग आला असता पूर्वीची दोन व्यंजने (म्हणजे प्रथम आणि तृतीय ही व्यंजने) अगोदर (म्हणजे प्रथम अवयव म्हणून ) येतात. म्हणजे द्वितीय व्यंजनाच्या आधी प्रथम व्यंजन आणि चतुर्थ व्यंजनाच्या आधी तृतीय व्यंजन येते असा अर्थ आहे. उदा. शेष (व्यंजनाचे द्वित्व होताना ) :- वक्खाणं... निब्भरो. आदेश (व्यंजनाचे द्वित्व होताना ) :- जक्खो; घ चे द्वित्व ( आढळत) नाही; अच्छी...भिब्भलो. तैलादौ या सूत्राने द्वित्व होताना:- ओक्खलं. सेवादौ या सूत्राने (विकल्पाने द्वित्व होताना) :- नक्खा, नहा. समासात :- कइद्धओ...कइधओ. (द्वितीय व चतुर्थ व्यंजनाचे) द्वित्व होतानाच (प्रथम व तृतीय व्यंजन अगोदर येते; द्वित्व होत नसल्यास तसे होत नाही. उदा.) खाओ.
( सूत्र ) दीर्घे वा ।। ९१ ।।
(वृत्ति) दीर्घशब्दे शेषस्य घस्य उपरि पूर्वो वा भवति। दिग्घो दीहो। (अनु.) दीर्घ या शब्दात ( र् चा लोप झाल्यावर) शेष असणाऱ्या घ च्या मागे पूर्वीचे (म्हणजे तिसरे व्यंजन) विकल्पाने येते. उदा. दिग्घो, दीहो.
२ यक्ष
१ व्याख्यान, व्याघ्र, मूर्च्छा, निर्झर, कष्ट, तीर्थ, निर्धन, गुल्फ, निर्भर. ३ अक्षि, मध्य, पृष्ठ, वृद्ध, हस्त, आश्लिष्ट, ६ कपिध्वज
४ उदूखल
५ नखाः
पुष्प, विह्वल.
७ खात.