________________
प्राकृत व्याकरणे
१४९
(सूत्र) ज्ञो ञः ॥ ८३।। (वृत्ति) ज्ञ: सम्बन्धिनो अस्य लुग् वा भवति। जाणं' णाणं। सव्वजो सव्वण्णू।
अप्पजो अप्पण्णू। दइवज्जो दइवण्णू। इंगिअजो इंगिअण्णू। मणोजं मणोण्णं। अहिजो अहिण्णू। पज्जा पण्णा। अजा आणा। संजा
सण्णा। क्वचिन्न भवति। विण्णाणं। (अनु.) ज्ञ (या संयुक्त व्यंजना) शी संबंधित असणाऱ्या अ चा लोप विकल्पाने
होतो. उदा. जाणं...सण्णा. क्वचित् (अ चा लोप) होत नाही. उदा. विण्णाणं.
(सूत्र) मध्याह्ने हः ।। ८४।। (वृत्ति) मध्याह्ने हस्य लुग् वा भवति। मज्झन्नो मज्झण्हो। (अनु.) मध्याह्न या शब्दात ह चा लोप विकल्पाने होतो. उदा. मज्झन्नो, मज्झण्हो.
(सूत्र) दशा ।। ८५।। (वृत्ति) पृथग्योगाद्वेति निवृत्तम्। दशार्हे हस्य लुग् भवति। दसारो। (अनु.) हे सूत्र पृथपणे सांगितले असल्याने (२.८० मधील) वा या शब्दाची
निवृत्ति होते. दशार्ह या शब्दात ह चा लोप होतो. उदा. दसारो.
(सूत्र) आदेः श्मश्रुश्मशाने ।। ८६।। (वृत्ति) अनयोरादेर्लुग् भवति। मासू मंसू मस्सू। मसाणं। आर्षे श्मशानशब्दस्य
सीआणं सुसाणमित्यपि भवति। (अनु.) श्मश्रु आणि श्मशान या दोन शब्दांत आदि (असणाऱ्या व्यंजना) चा लोप
होतो. उदा. मासू...मसाणं. आर्ष प्राकृतात श्मशान शब्दाची सीआणं आणि सुसाणं अशी सुद्धा (वर्णान्तरे/रूपे) होतात.
१ ज्ञान, सर्वज्ञ, आत्मज्ञ (अल्पज्ञ), दैवज्ञ, इंगितज्ञ, मनोज्ञ, अभिज्ञ, प्रज्ञा, आज्ञा, संज्ञा. २ विज्ञान
A-Proof