________________
(१४)
आवन्ती. (आवन्तिका, अवन्तिजा) ही माहाराष्ट्री व शौरसेनी यांच्या संकराने बनली आहे. प्राच्या भाषेची सिद्धि शौरसेनीवरूनच झालेली आहे. बाहलीकी ही भाषा, 'र' चा ‘ल' होणे हा फरक सोडल्यास, आवन्ती भाषेतच अंतर्भूत होते. शाकारी हा मागधीचाच एक प्रकार आहे. चाण्डाली ही मागधी व शौरसेनी यांच्या मिश्रणाने बनली आहे, असे मार्कंडेय५ सांगतो; तर पुरुषोत्तम देवाच्या मते, चाण्डाली म्हणजे मागधीचाच एक प्रकार आहे. शाबरी हीही मागधीचाच एक प्रकार आहे. आभीरी ही शाबरीप्रमाणेच आहे; फक्त ‘क्त्वा' प्रत्ययाला इअ आणि उअ असे आदेश आभीरीत होतात. संस्कृत व शौरसेनी यांच्या मिश्रणाने टाक्की बनली आहे. जैनांच्या अर्धमागधीला हेमचंद्र आर्ष म्हणतो व तिला माहाराष्ट्रीचे नियम विकल्पाने लागतात१०, असे त्याचे सांगणे आहे. आणि अर्धमागधी ही पुष्कळशी माहाराष्ट्रीसारखीच११ आहे.
तसेच, चूलिकापैशाची व पैशाचीचे इतर प्रकार हे पैशाचीचे उपभेद आहेत. त्याचप्रमाणे अपभ्रंशाचे प्रकारही अपभ्रंशाचे उपभेद आहेत.
वरील भाग जर लक्षात घेतला तर माहाराष्ट्री, शौरसेनी, मागधी, पैशाची आणि अपभ्रंश यांनाच प्रधान प्राकृत मानण्यात हरकत नसावी.
१ आवन्ती स्यान्महाराष्ट्रीशौरसेन्यास्तु संकरात्। मार्कंडेय २ प्राच्यासिद्धिः शौरसेन्याः। मार्कंडेय ३ आवन्त्यामेव बालीकी किन्तु रस्यात्र लो भवेत्। मार्कंडेय _ विशेषो मागध्या:। पुरुषोत्तम; मागधीवरून शाकारी सिद्ध झाली आहे (मागध्या:
शाकारी), असे मार्कंडेय म्हणतो. चाण्डाली मागधीशौरसेनीभ्यां प्रायशो भवेत्। मार्कंडेय मागधीविकृतिः। पुरुषोत्तम शाबरी च मागधीविशेषः। पुरुषोत्तम. मार्कंडेयाच्या मते चाण्डालीतून शाबरीची सिद्धि होते (चाण्डाल्या: शाबरीसिद्धिः।)
आभीर्यप्येवं स्यात् क्त्व इअउऔ नात्यपभ्रंशः। मार्कंडेय. ९ टाक्की स्यात् संस्कृतं शौरसेनी चान्योन्यमिश्रिते। मार्कंडेय. १० आर्ष प्राकृतं बहुलं भवति। आर्षे हि सर्वे विधयो विकल्प्यन्ते। हेमचंद्र ११ मागे उल्लेखिल्याप्रमाणे जैन माहाराष्ट्री ही माहाराष्ट्री व अर्धमागधी यांचे मिश्रण आहे;
आणि जैन शौरसेनी ही शौरसेनी व अर्धमागधी यांचे मिश्रण आहे.