________________
(ई) मागधी, अवन्तिजा, प्राच्या, शौरसेनी, अर्धमागधी, बाह्लीका आणि दाक्षिणात्या अशा सात प्राकृतांचा निर्देश भरताने केला आहे. ( उ ) प्राकृत ( माहाराष्ट्री), आर्ष, शौरसेनी, मागधी, पैशाची, चूलिका पैशाची व अपभ्रंश या सात भाषा हेमचंद्र सांगतो.
(ऊ) माहाराष्ट्री, शौरसेनी, प्राच्या, आवन्ती, मागधी, शाकारी, चाण्डाली, शाबरी, टक्कदेशीया, अपभ्रंश ( व तिचे प्रकार) आणि पैशाची ( व तिचे प्रकार) पुरुषोत्तमदेवाच्या प्राकृतानुशासनात आढळतात.
(ए) मार्कंडेय सोळा प्राकृतांची चर्चा करतो. प्रथम तो प्राकृतचे भाषा, विभाषा, अपभ्रंश व पैशाच असे चार विभाग करतो. या विभागांत तो पुढीलप्रमाणे भाषा सांगतो :- १) भाषा :माहाराष्ट्री, शौरसेनी, प्राच्या, आवन्ती आणि मागधी. २) विभाषा :- शाकारी चाण्डाली, शाबरी, आभीरिका व टाक्की. ३) अपभ्रंश :- नागर, व्राचड आणि उपनागर. ४) पैशाच :- कैकेय, शौरसेन व पाञ्चाल?.
प्रधान प्राकृत भाषा
भारतीय प्राकृत वैयाकरणांनी काही जमातींच्या बोलीभाषा व काही प्रांतातील भाषा यांना प्राकृत शब्द लावलेला दिसतो. पण या संदर्भातही काही प्राकृत वैयाकरण काही प्राकृतांना इतर प्राकृतांचे मिश्रण वा उपप्रकार मानतात. उदा.
१
(१३)
२
३
मागध्यवन्तिजा प्राच्या शौरसेन्यर्धमागधी ।
बाह्लीका दाक्षिणात्या च सप्त भाषाः प्रकीर्तिताः ॥ भरत
तच्च भाषाविभाषापभ्रंशपैशाचभेदतः ।
चतुर्विधं तत्र भाषा विभाषाः पञ्चधा पृथक्॥ अपभ्रंशास्त्रयस्तिस्रः पैशाच्यश्चेति षोडश। माहाराष्ट्री शौरसेनी प्राच्यावन्ती च मागधी॥ इति पञ्चविधाः भाषाः ।
शाकारी चैव चाण्डाली शाबर्याभीरिका तथा । टाक्कीति युक्ताः पञ्चैव विभाषाः॥
नागरो व्राचडश्चोपनागरश्चेति ते त्रयः । अपभ्रंशाः ॥
कैकेयं शौरसेनं च पाञ्चालमिति च त्रिधा। पैशाच्यः ॥
दाक्षिणात्या भाषेचे लक्षण व उदाहरण कुठेच सापडत नाही ( दाक्षिणात्यायास्तु न लक्षणं नोदाहरणं च कुत्रचिद् दृश्यते), असे मार्कंडेय सांगतो.