________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
१४७
सद्दो। अब्दः अद्दो। लुब्धकः लोद्धओ । र । अर्क: अक्को। वर्गः वग्गो। अधः। श्लक्ष्णं सहं । विक्लवः विक्कवो । पक्वं पक्कं पिक्कं। ध्वस्तः धत्थो । चक्रं चक्कं । ग्रहः गहो । रात्रिः रत्ती । अत्र द्व इत्यादिसंयुक्तानामुभयप्राप्तौ यथादर्शनं लोपः । क्वचिदूर्ध्वम् । उद्विग्नः उव्विग्गो। द्विगुणः वि - उणो । द्वितीयः बीओ। कल्मषं कम्मसं । सर्वं सव्वं । शुल्बं सुब्बं । क्वचित्त्वधः काव्यं कव्वं । कुल्या कुल्ला। माल्यं मल्लं । द्विपः दिओ । द्विजाति: दुआई । क्वचित्पर्यायेण । द्वारं बारं दारं । उद्विग्नः उव्विण्णो । अवन्द्र इति किम्? वन्द्रं। संस्कृतसमोऽयं प्राकृतशब्दः । अत्रोत्तरेण विकल्पोऽपि न भवति निषेधसामर्थ्यात् ।
(अनु.) वन्द्र शब्द सोडून अन्यत्र (म्हणजे इतर शब्दांत ) संयुक्त व्यंजनात अगोदर किंवा नंतर (म्हणजे प्रथम किंवा द्वितीय अवयव) असणाऱ्या ल, ब आणि र यांचा सर्वत्र लोप होतो. उदा. प्रथम असताना :- ल ( चा लोप : - ) उल्का...वक्कलं. ब (चा लोप:-) शब्द...लोद्धओ. र ( चा लोप:-) अर्क...वग्गो. नंतर असताना :- ( ल चा लोप:-) श्लक्ष्णम्... विक्कवो. (व चा लोप:-) पक्वम्... धत्थो. ( र चा लोप:-) चक्रम्... रत्ती. येथे, द्व इत्यादि संयुक्त व्यंजनांत (एकाचवेळी पहिला व दुसरा अवयव यांचा लोप अशा) दोहोंची प्राप्ति झाली असताना, (वाङ्मयात) आढळेल त्याप्रमाणे (कोणत्याही एका अवयवाचा) लोप (करावा ). ( तेव्हा) क्वचित् प्रथम असणाऱ्या (अवयवा) चा (लोप होतो. उदा.) उद्विग्न... सुब्बं. (तर कधी ) नंतर असणाऱ्या (अवयवा ) चा ( लोप होतो. उदा.) काव्यम्... दुआई. क्वचित पर्यायाने (प्रथम व नंतर) असणाऱ्या ( अवयवा) चा लोप होतो. उदा.) द्वारम्...उव्विणो. वन्द्र शब्द सोडून असे का म्हटले आहे ? (कारण प्राकृतात) वन्द्र (हा शब्द तसाच रहातो). वन्द्र हा प्राकृत शब्द संस्कृतसम आहे. या (वन्द्र शब्दाचे) बाबतीत, (प्रस्तुत सूत्रातील) निषेधाच्या सामर्थ्याने, पुढील सूत्रात (२.८०) सांगितल्याप्रमाणे विकल्पसुद्धा होत नाही.