SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 144
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ A-Proof प्राकृत व्याकरणे १४३ (सूत्र) बृहस्पति - वनस्पत्योः सो वा ।। ६९॥ ( वृत्ति) अनयोः संयुक्तस्य सो वा भवति । बहस्सई बहप्फई भयस्सई भयप्फई । वणस्सई वणप्फई। (अनु.) बृहस्पति आणि वनस्पति या शब्दांत संयुक्त व्यंजनाचा स विकल्पाने होतो. उदा. बहस्सई...........वणप्फई. ( सूत्र ) बाष्पे होऽश्रुणि ।। ७० ।। ( वृत्ति) बाष्पशब्दे संयुक्तस्य हो भवति अश्रुण्यभिधेये । बाहो नेत्रजलम् । अश्रुणीति किम् ? बप्फो ऊष्मा । (अनु.) (बाष्प या शब्दाने) अश्रु हा अर्थ सांगावयाचा असताना बाष्प या शब्दात संयुक्त व्यंजनाचा ह होतो. उदा. बाहो (म्हणजे ) डोळ्यातील पाणी (अश्रु). अश्रु हा अर्थ सांगावयाचा असताना असे का म्हटले आहे ? (कारण अश्रु हा अर्थ बाष्प शब्दाचा नसेल तर ष्प चा ह होत नाही. उदा.) बप्फो (म्हणजे ) ऊष्मा (उष्णता). ( सूत्र ) कार्षापणे ।। ७१।। ( वृत्ति) कार्षापणे संयुक्तस्य हो भवति । काहावणो । कथं कहावणो । ह्रस्वः संयोगे (१.८४) इति पूर्वमेव ह्रस्वत्वे पश्चादादेशे कर्षापणशब्दस्य वा भविष्यति । (अनु.) कार्षापण या शब्दात संयुक्त व्यंजनाचा ह होतो. उदा. काहावणो. (मग) कहावणो (हे वर्णान्तर) कसे होते ? ( उत्तर - ) ( कार्षापण या शब्दात ) ‘ह्रस्वः संभोगे' या सूत्रानुसार अगोदरच ( का मधील आ) ह्रस्व झाला आणि मग (या सूत्रात सांगितल्याप्रमाणे र्ष ला ह) आदेश झाला. किंवा कहावणो हे कर्षापण शब्दाचे (वर्णान्तर) होईल. ( सूत्र ) दुःख - दक्षिण - तीर्थे वा ।। ७२ ।। ( वृत्ति) एषु संयुक्तस्य हो वा भवति । दुहं दुक्खं । पर- दुक्खे दुक्खिआ १ परदुःखे दुःखिताः विरलाः ।
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy