________________
१४२
द्वितीयः पादः
___ म्हटले आहे ? (कारण एकारापुढे र्य नसल्यास त्याचा र न होता ज्ज होतो.
उदा.) पजतो.
(सूत्र) आश्चर्ये ।। ६६॥ (वृत्ति) आश्चर्ये एत: परस्य यस्य रो भवति। अच्छेरं। एत इत्येव। अच्छरिअं। (अनु.) आश्चर्य शब्दात (श्च मधील अ चा ए होऊन त्या) ए पुढे असणाऱ्या र्य
चा र होतो. उदा. अच्छेरं. ए पुढे (र्य) असतानाच (त्याचा र होतो; तसे नसल्यास र होत नाही. उदा.) अच्छरिअं.
(सूत्र) अतो रिआर-रिज-रीअं ।। ६७।। (वृत्ति) आश्चर्ये अकारात्परस्य यस्य रिअ अर रिज रीअ इत्येते आदेशा __ भवन्ति। अच्छरिअं अच्छअरं अच्छरिजं अच्छरीअं। अत इति किम्?
अच्छेरं। (अनु.) आश्चर्य या शब्दात (श्च मधील) अकाराच्या पुढे असणाल्या र्य चे
रिअ, अर, रिज्ज आणि रीअ असे हे आदेश होतात. उदा. अच्छरिअं...अच्छरीअं. अकाराच्या पुढे असणाऱ्या (र्य चे) असे का म्हटले आहे ? (कारण श्च मधील अ चा जर ए होत असेल तर हे आदेश न होता सू.२.६६ नुसार) अच्छेरं (असे वर्णान्तर होते).
(सूत्र) पर्यस्त-पर्याण-सौकुमार्ये ल्लः ।। ६८॥ (वृत्ति) एषु यस्य ल्लो भवति। पर्यस्तं पल्लर्से पल्लत्थं। पल्लाणं। सोअमल्लं।
पल्लंको इति च पल्यङ्कशब्दस्य यलोपे द्वित्वे च। पलिअंको इत्यपि
चौर्यसमत्वात्। (अनु.) पर्यस्त, पर्याण आणि सौकु मार्य या शब्दांत र्य चा ल्ल होतो.
उदा. पर्यस्तम्...सोअमल्लं. पल्लंक हा शब्द पल्यङ्क या शब्दातील य् चा लोप होऊन आणि ल् चे द्वित्व होऊन सिद्ध झालेला आहे. (पल्यङ्क शब्दाचे) पलिअंको असे सुद्धा (वर्णान्तर होते); कारण तो चौर्यसम शब्द आहे.