________________
प्राकृत व्याकरणे
१४१
म चा) लोप होतो (२.७८) या नियमाचा प्रस्तुत नियम अपवाद आहे. उदा. जम्मो....मम्मणं.
(सूत्र) ग्मो वा ।। ६२॥ (वृत्ति) ग्मस्य मो वा भवति। युग्मं जुम्मं जुग्गं। तिग्मं तिम्मं तिग्गं। (अनु.) ग्म चा म विकल्पाने होतो. उदा. युग्मम्.....तिग्गं.
(सूत्र) ब्रह्मचर्य-तूर्य-सौन्दर्य-शौण्डीर्ये र्यो रः ।। ६३।। (वृत्ति) एषु र्यस्य रो भवति। जापवादः। बम्हचेरं। चौर्यसमत्वाद् बम्हचरिअं।
तूरं। सुंदेरं। सोण्डीरं। (अनु.) ब्रह्मचर्य, तूर्य, सौन्दर्य आणि शौण्डीर्य या शब्दांत र्य चा र होतो. (र्य चा)
ज होतो या नियमाचा (२.२४) प्रस्तुत नियम अपवाद आहे. उदा. बम्हचेर; (ब्रह्मचर्य हा शब्द) चौर्य शब्दासारखा असल्याने (त्यामध्ये स्वरभक्ति होऊन) बम्हचरिअं (असेही वर्णान्तर होते); तूरं....सोंडीरं.
(सूत्र) धैर्ये वा ।। ६४॥ (वृत्ति) धैर्ये र्यस्य रो वा भवति। धीरं धिज्जं। सूरो सुज्जो इति तु सूरसूर्य
प्रकृतिभेदात्। (अनु.) धैर्य या शब्दात र्य चा र विकल्पाने होतो. उदा. धीरं, धिजं. सूरो आणि
सुजो हे शब्द मात्र सूर आणि सूर्य या दोन मूळ भिन्न (संस्कृत) शब्दांपासून साधलेले आहेत.
(सूत्र) एत: पर्यन्ते ।। ६५॥ (वृत्ति) पर्यन्ते एकारात्परस्य यस्य रो भवति। पेरन्तो। एत इति किम् ?
पज्जन्तो। (अनु.) पर्यन्त या शब्दात, (प मधील अ चा ए होऊन; त्या) एकारापुढे असणाऱ्या
र्य चा र होतो. उदा. पेरतो. एकारापुढे असणाऱ्या (र्य चा) असे का
A-Proof