________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
(अनु.) ड्म आणि क्म यांचा प होतो. उदा. कुड्मलं...रुप्पिणी. क्वचित् (क्म चा) च्म सुद्धा (होतो. उदा.) रुच्मी रुप्पी ।
१३९
( सूत्र ) ष्प - स्पयो: फः ।। ५३ ।।
(वृत्ति) ष्पस्पयो : फो भवति । पुष्पं पुष्पं । शष्पं सप्फं । निष्पेषः निप्फेसो । निष्पावः निप्फावो । स्पन्दनं फंदणं । प्रतिस्पर्धिन् पाडिप्फद्धी । बहुलाधिकारात् क्वचिद् विकल्पः । बुहप्फई' बुहप्पई। क्वचिन्न भवति । निप्पहो । णिप्पुंसणं । परोप्परं ।
(अनु.) ष्प आणि स्प यांचा फ होतो. उदा. (ष्प चा फ) :- पुष्पम्...निप्फावो. (स्प चा फ)ः- स्पन्दनम्... पाडिप्फद्धी. बहुलचा अधिकार असल्यामुळे क्वचित् विकल्प होतो. उदा. बुहप्फई, बुहप्पई. क्वचित् (ष्प आणि स्प यांचा फ) होत नाही. उदा. निप्पहो..... परोप्परं.
( सूत्र ) भीष्मे ष्मः ।। ५४।।
( वृत्ति) भीष्मे ष्मस्य को भवति । भिप्फो ।
(अनु.) भीष्म या शब्दात ष्म चा फ होतो. उदा. भिप्फो.
( सूत्र ) श्लेष्मणि वा ।। ५५।।
( वृत्ति) श्लेष्मशब्दे ष्मस्य को वा भवति । सेफो सिलिम्हो ।
(अनु.) श्लेष्मन् या शब्दात ष्म चा फ विकल्पाने होतो. उदा. सेफो, सिलिम्हो.
( सूत्र ) ताम्राम्रे म्ब: ।। ५६।।
( वृत्ति) अनयोः संयुक्तस्य मयुक्तो बो भवति । तम्बं । अम्बं । अम्बिर तम्बिर इति देश्यौ ।
(अनु.) ताम्र आणि आम्र या दोन शब्दांत संयुक्त व्यंजनाचा मकाराने युक्त ब
१ बृहस्पति
२ निष्प्रभ, निस्पर्शन, परस्पर