________________
१३८
द्वितीयः पादः
( सूत्र ) वोत्साहे थो हश्च र: ।। ४८।।
(वृत्ति) उत्साहशब्दे संयुक्तस्य थो वा भवति तत्संनियोगे च हस्य रः । उत्थारो
उच्छाहो।
(अनु.) उत्साह या शब्दात संयुक्त व्यंजनाचा थ विकल्पाने होतो आणि त्याच्या सांनिध्यामुळे ह चा र होतो. उदा. उत्थारो, उच्छाहो.
( सूत्र ) आश्लिष्टे ल - धौ ।। ४९ ।।
(वृत्ति) आश्लिष्टे संयुक्तयोर्यथासङ्ख्यं ल ध इत्येतौ भवत:। आलिद्धो। (अनु.) आश्लिष्ट या शब्दांत संयुक्त व्यंजनांचे अनुक्रमे ल आणि ध असे हे (विकार) होतात. उदा. आलिद्धो.
( सूत्र ) चिह्न
वा ।। ५० ।।
(वृत्ति) चिह्ने संयुक्तस्य न्धो वा भवति । ण्हापवादः । पक्षे सोऽपि । चिन्धं इन्धं चिन्हं ।
(अनु.) चिह्न या शब्दात संयुक्त व्यंजनाचा न्ध विकल्पाने होतो. ( न चा) ह होतो या नियमाचा (२.७५ ) प्रस्तुत नियम अपवाद आहे. (विकल्प-) पक्षी तो सुद्धा (नियम लागतो). उदा. चिन्धं... चिन्हं.
( सूत्र ) भस्मात्मनो: पो वा ।। ५१ ।।
(वृत्ति) अनयोः संयुक्तस्य पो वा भवति । भप्पो भस्सो । अप्पा अप्पाणो । पक्षे। अत्ता।
(अनु.) भस्मन् आणि आत्मन् या दोन शब्दांत संयुक्त व्यंजनाचा प विकल्पाने होतो. उदा. भप्पो.....अप्पाणो. (विकल्प - ) पक्षी :- अत्ता (असे आत्मन् चे वर्णान्तर होते).
( सूत्र ) मक्मो: ।। ५२ ।।
(वृत्ति) ङ्मक्मो: पो भवति । कुड्मलं कुम्पलं । रुक्मिणी रुप्पिणी। क्वचित् मोऽपि । रुच्मी रुप्पी ।