________________
A-Proof
प्राकृत व्याकरणे
(अनु.) उष्ट्र इत्यादि (म्हणजे उष्ट्र, इष्टा, संदष्ट हे शब्द सोडून (इतर शब्दांत ) ष्ट चा ठ होतो. उदा. लट्ठी... अणिट्ठ. उष्ट्र, इष्टा, संदष्ट हे शब्द सोडून असे (सूत्रात) का म्हटले आहे ? ( कारण या शब्दात ष्ट चा ठ होत नाही, तर ट्ट होतो. उदा.) उट्टो.....संदट्टो.
१३५
( सूत्र ) गर्ते ड: ।। ३५।।
( वृत्ति) गर्तशब्दे संयुक्तस्य डो भवति । टापवादः । गड्डो । गड्डा । (अनु.) गर्त या शब्दात संयुक्त व्यंजनाचा ड होतो. (र्त चा ) ट होतो या नियमाचा (२.३०) (प्रस्तुत नियम ) अपवाद आहे. उदा. गो, गा.
( सूत्र ) संमर्द - वितर्दि - विच्छर्द- च्छर्दि - कपर्द - मर्दिते र्दस्य ।। ३६ ।। (वृत्ति) एषु र्दस्य डत्वं भवति । समड्डो । विअड्डी। विच्छड्डो। छड्डुइ'। छड्डी। कवड्डो । मड्डिओ। संमड्डिओ' ।
(अनु.) संमर्द, वितर्दि, विच्छर्द, छर्दि, कपर्द आणि मर्दित या शब्दांत, र्द चा ड होतो. उदा. संमड्डो.....संमडिओ.
( सूत्र ) गर्दभे वा ।। ३७।।
(वृत्ति) गर्दभे र्दस्य डो वा भवति। गड्डहो गद्दहो ।
(अनु.) गर्दभ या शब्दात र्द चा विकल्पाने होतो. उदा. गड्डहो, गद्दहो.
( सूत्र ) कन्दरिका - भिन्दिपाले ण्ड: ।। ३८।।
( वृत्ति) अनयोः संयुक्तस्य ण्डो भवति । कण्डलिआ। भिण्डिवालो।
(अनु.) कन्दरिका आणि भिन्दिपाल या दोन शब्दांत संयुक्त व्यंजनाचा ण्ड होतो. उदा. कण्डलिआ, भिण्डिवालो.
१ छड्डु हा मुच् धातूचा आदेश आहे (४.९१ पहा). २ संमर्दित