________________
१२४
प्रथमः पादः
(अनु.) दुर्गादेवी, उदुम्बर, पादपतन आणि पादपीठ या शब्दांत अन्तर् म्हणजे मध्ये
असणाऱ्या दकाराचा स्वरासह विकल्पाने लोप होतो. उदा. दुग्गावी...पायवीढं. मध्ये असणाऱ्या (दकाराचा) असे का म्हटले आहे ? (कारण) दुर्गादेवी या शब्दांत पहिल्या दकाराला हा नियम लागू नये म्हणून.
(सूत्र) यावत्तावजीवितावर्तमानावट-प्रावारक-देवकुलैवमेवे वः
॥२७१॥ (वृत्ति) यावदादिषु सस्वरवकारस्यान्तर्वर्तमानस्य लुग् वा भवति। जा जाव।
ता ताव। जी जीविअं। अत्तमाणो आवत्तमाणो। अडो अवडो। पारओ पावारओ। देउलं देव-उलं। एमेव एवमेव। अन्तरित्येव।
एवमेवेऽन्त्यस्य न भवति। (अनु.) यावत्, तावत्, जीवित, आवर्तमान, अवट, प्रावारक, देवकुल आणि
एवमेव या शब्दांत मध्ये असणाऱ्या वकाराचा स्वरासह विकल्पाने लोप होतो. उदा. जा...एवमेव. मध्ये असणाऱ्याच (वकाराचा विकल्पाने होतो; म्हणून) एवमेव या शब्दात अन्त्य (वकारा) चा (विकल्पाने लोप) होत नाही.
इत्याचार्यश्रीहेमचन्द्रविरचितायां सिद्धहेमचन्द्राभिधानस्वोपज्ञशब्दानुशासनवृत्तौ
अष्टमस्याध्यायस्य प्रथमः पादः ।।
(आठव्या अध्यायाचा प्रथम पाद समाप्त झाला.)