________________
प्राकृत व्याकरणे
हे दाखविण्यासाठी (प्रस्तुत सूत्रात) चकार ( = च हा शब्द) वापरलेला आहे. उदा. णिडालं, णडालं.
( सूत्र ) शबरे बो मः ।। २५८।।
( वृत्ति) शबरे बस्य मो भवति । समरो।
(अनु.) शबर या शब्दात ब चा म होतो. उदा. समरो.
१२१
( सूत्र ) स्वप्न - नीव्योर्वा ।। २५९ ।।
(वृत्ति) अनयोर्वस्य मो वा भवति । सिमिणो सिविणो । नीमी नीवी ।
(अनु.) स्वप्न आणि नीवी या दोन शब्दांत व चा म विकल्पाने होतो. उदा. सिमिणो...नीवी.
( सूत्र ) श - षो: स: ।। २६०।।
(वृत्ति) शकारषकारयोः सो भवति । श । सद्दोः । कुसो । निसंसो। वंसो । सामा। सुद्धं । दस । सोहइ । विसइ । ष । सण्डो । निहसो । कसाओ। घोसइ । उभयोरपि । सेसो३ । विसेसो ।
(अनु.) शकार आणि षकार या दोहोंचा स होतो. उदा. श ( चा स ) :- सद्दो... विसइ. ष (चा स):- संडो...घोसइ. (श आणि ष या) दोहोंचाही (स):- सेसो, विसेसो.
( सूत्र ) स्नुषायां ण्हो न वा ।। २६१।।
(वृत्ति) स्नुषाशब्दे षस्य ण्हः णकाराक्रान्तो हो वा भवति । सुण्हा सुसा । (अनु.) स्नुषा या शब्दात ष चा ण्ह (असा ) णकाराने युक्त ह विकल्पाने होतो. उदा. सुण्हा, सुसा.
१ शब्द, कुश, नृशंस, वंश, शामा, शुद्ध, दश, शोभते, विशति २ षण्ड, निकष, कषाय,
घोषयति
३ शेष, विशेष