SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 121
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ १२० प्रथमः पादः हलिद्दी...निठुलो. बहुलचा अधिकार असल्यामुळे चरण शब्द पाय या अर्थी असतानाच (त्यातील र चा ल होतो). (पाय हा चरणचा अर्थ नसताना) इतर ठिकाणी (र चा ल होत नाही. उदा.) चरणकरणं. भ्रमर या शब्दात स चे सांनिध्य असतानाच (र चा ल होतो. स चे सांनिध्य नसल्यास) इतर ठिकाणी (र चा ल होत नाही. उदा.) भमरो. त्याचप्रमाणे (काही शब्दांत र चा ल न होता) जढरं...निट्ठरो, इत्यादि सुद्धा (वर्णान्तरे होतात). (वरील शब्दांचे मूळ संस्कृत शब्द क्रमाने असे:) हरिद्रा...निष्ठुर, इत्यादि. आर्ष प्राकृतात दुवालसंगे इत्यादि (वर्णान्तर) सुद्धा होते. (सूत्र) स्थूले लो रः ।। २५५।। (वृत्ति) स्थूले लस्य रो भवति। थोरं। कथं थूलभद्दो। स्थूरस्य हरिद्रादिलत्वे भविष्यति। (अनु.) स्थूल या शब्दात ल चा र होतो. उदा. थोरं. (मग) थूलभद्दो (हे वर्णान्तर) कसे होते ? (उत्तर- स्थूरभद्र या शब्दातील) स्थूर या शब्दात हरिद्रा इत्यादि शब्दांतल्याप्रमाणे (र चा) ल होऊन (सू.१.२५४ पहा), थूलभद्द हे वर्णान्तर होईल. (सूत्र) लाहल-लाङ्गल-लाङ्गेले वादेर्णः ।। २५६।। (वृत्ति) एषु आदेर्लस्य णो वा भवति। णाहलो लाहलो। णंगल लंगलं। णंगूलं लंगूलं। (अनु.) लाहल, लाङ्गल आणि लागूल या शब्दांत आदि ल चा ण विकल्पाने होतो. उदा. णाहलो...लंगूल. (सूत्र) ललाटे च ।। २५७।। (वृत्ति) ललाटे च आदेर्लस्य णो भवति। चकार आदेरनुवृत्त्यर्थः। णिडालं णडालं। (अनु.) आणि ललाट या शब्दात आदि ल चा ण होतो. (सू.१.२५६ मधील) आदेः (पहिल्याच्या) या पदाची अनुवृत्ति (प्रस्तुत १.२५७ सूत्रात) आहे
SR No.007791
Book TitlePrakrit Vyakaran
Original Sutra AuthorHemchandracharya
Author
PublisherShrutbhuvan Sansodhan Kendra
Publication Year2015
Total Pages594
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Devnagari
File Size2 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy