________________
प्राकृत व्याकरणे
११३
नई। णेइ नेइ। असंयुक्तस्येत्येव। न्याय: नाओ। (अनु.) असंयुक्त आणि आदि असणाऱ्या न चा ण विकल्पाने होतो. उदा. णरो....नेइ.
असंयुक्त असणाऱ्या (न चाच ण होतो; न संयुक्त असेल तर विकल्पाने ण होत नाही. उदा.) न्याय: नाओ.
(सूत्र) निम्ब-नापिते लण्हं वा ।। २३०।। (वृत्ति) अनयोर्नस्य ल ण्ह इत्येतौ वा भवतः। लिम्बो निम्बो। पहाविओ
न्हाविओ। (अनु.) निम्ब व नापित या दोन शब्दांत न चे ल आणि ण्ह असे हे (विकार)
विकल्पाने होतात. उदा. लिंबो.... न्हाविओ.
(सूत्र) पो वः ।। २३१॥ (वृत्ति) स्वरात्परस्यासंयुक्तस्यानादेः पस्य प्रायो वो भवति। सवहो । सावो।
उवसग्गो। पईवो। कासवो। पावं। उवमा। कविलं। कुणवं। कलावो। कवालं। महिवालो। गोवइ। तवइ। स्वरादित्येव। कंपइ। असंयुक्तस्येत्येव। अप्पमत्तो। अनादेरित्येव। सुहेण पढइ । प्राय इत्येव। कई। रिऊ। एतेन पकारस्य प्राप्तयोर्लोपवकारयोर्यस्मिन् कृते
श्रुतिसुखमुत्पद्यते स तत्र कार्यः। (अनु.) स्वरापुढे असणाऱ्या, असंयुक्त, अनादि अशा प चा प्रायः व होतो.
उदा. सवहो...तवइ. स्वरापुढे असतानाच (प चा व होतो; मागे अनुस्वार असल्यास होत नाही. उदा.) कंपइ. असंयुक्त असतानाच (प चा व होतो; संयुक्त प असल्यास व होत नाही. उदा.) अप्पमत्तो. अनादि असतानाच (प चा व होतो; प आदि असल्यास होत नाही. उदा.) सुहेण पढइ. प्रायः (प चा व होतो; त्यामुळे कधी प चा व होत नाही. उदा.) कई, रिऊ. तेव्हा पकाराच्या बाबतीत प्राप्त होणारे लोप आणि
१ क्रमाने:- शपथ, शाप, उपसर्ग, प्रदीप, काश्यप, पाप, उपमा, कपिल,
कुणप, कलाप, कपाल, महीपाल, गोपायते, तपति । २ कम्पते ३ अप्रमत्त ४ सुखेन पठति ५ कपि, रिपु.