________________
प्राकृत व्याकरणे
१११
असा र् होत नाही. उदा.) ते दस. असंयुक्त असतानाच (द् चा र् होतो; संयुक्त असल्यास असा र् होत नाही. उदा.) चउद्दह.
( सूत्र ) कदल्यामद्रुमे ।। २२० ।।
(वृत्ति) कदलीशब्दे अद्रुमवाचिनि दस्य रो भवति । करली। अद्रुम इति किम् ? कयली केली ।
(अनु.) कदली या शब्दात त्याचा झाड हा अर्थ नसताना द चा र होतो. उदा. करली. (कदली शब्दाचा अर्थ ) झाड नसताना असे का म्हटले आहे ? (कारण झाड हा अर्थ असताना कदली शब्दात द चा र होत नाही. उदा.) कयली, केली.
(सूत्र) प्रदीपि - दोहदे लः ।। २२१।।
( वृत्ति) प्रपूर्वे दीप्यतौ धातौ दोहदशब्दे च दस्य लो भवति । पत्नीवेइ । पलित्तं । दोहलो।
(अनु.) प्र ( उपसर्ग) पूर्वी असणाऱ्या दीप् या धातूत आणि दोहद या शब्दात द चा ल होतो. उदा. पलीवेइ.... दोहलो.
( सूत्र ) कदम्बे वा ।। २२२।।
( वृत्ति) कदम्बशब्दे दस्य लो वा भवति । कलंबो कयंबो।
(अनु.) कदम्ब या शब्दात द चा ल विकल्पाने होतो. उदा. कलंबो, कयंबो.
(सूत्र) दीपौधो वा ।। २२३।।
(वृत्ति) दीप्यतौ दस्य धो वा भवति । धिप्पड़ दिप्पड़ ।
(अनु.) दीप्यति (या धातुरूपा) मध्ये द चा ध विकल्पाने होतो. उदा. धिप्पइ,
दिप्पइ.
१ प्रदीप्यति, प्रदीप्त, दोहद.