________________
प्राकृत व्याकरणे
१०९
(सूत्र) पलिते वा ।। २१२।। (वृत्ति) पलिते तस्य लो वा भवति। पलिलं पलिअं। (अनु.) पलित या शब्दात त चा ल विकल्पाने होतो. उदा. पलिलं, पलिअं.
(सूत्र) पीते वो ले वा ।। २१३।। (वृत्ति) पीते तस्य वो वा भवति स्वार्थलकारे परे। पीवलं पीअलं। ल इति
किम् ? पी। (अनु.) पीत या शब्दात (पीत च्या) पुढे स्वार्थे लकार असताना त चा व विकल्पाने
होतो. उदा. पीवलं, पीअलं. (स्वार्थे) लकार (पुढे असताना) असे का म्हटले आहे ? (कारण पीत पुढे स्वार्थे लकार नसल्यास त चा व विकल्पाने होत नाही. उदा.) पीअं.
(सूत्र) वितस्ति-वसति-भरत-कातर-मातुलिने हः ।। २१४।। (वृत्ति) एषु तस्य हो भवति। विहत्थी। वसही। बहुलाधिकारात् क्वचिन्न
भवति। वसई। भरहो। काहलो। माहुलिंगं। मातुलुङ्गशब्दस्य तु
माउलुंगे। (अनु.) वितस्ति, वसति, भरत, कातर आणि मातुलिंग या शब्दांत त चा ह होतो.
उदा. विहत्थी, वसही; बहुलचा अधिकार असल्यामुळे (क्वचित् त चा ह) होत नाही. उदा. वसई; भरहो...लिंग. पण मातुलुंग शब्दाचे वर्णान्तर मात्र माउलुंगं असे होते.
(सूत्र) मेथि-शिथिर-शिथिल-प्रथमे थस्य ढः ।। २१५।। (वृत्ति) एषु थस्य ढो भवति। हापवादः। मेढी। सिढिलो। सिढिलो। पढमो। (अनु.) मेथि, शिथिर, शिथिल आणि प्रथम या शब्दांत थ चा ढ होतो. (थ चा)
ह होतो या नियमाचा (१.१८७) प्रस्तुत नियम अपवाद आहे. उदा. मेढी....पढमो.