________________
१०८
प्रथमः पादः
आकिई। निर्वृतः निव्वुओ। तात: ताओ। कतरः कयरो। द्वितीयः दुइओ इत्यादयः प्रयोगा भवन्ति। न पुन: उद् रयदं इत्यादि। क्वचित् भावेऽपि व्यत्ययश्च (४.४४७) इत्येव सिद्धम्। दिही इत्येतदर्थं तु
धृतेर्दिहिः (२.१३१) इति वक्ष्यामः। (अनु.) रुदित या शब्दात दि सह त चा द्विरुक्त ण (=ण्ण) होतो. उदा. रुण्णं.
या ठिकाणी 'ऋत्वादिषु दः' (ऋतु इत्यादि शब्दांत त चा द होतो) या नियमाचा प्रारंभ काही (वैयाकरण) करतात; पण तो नियम शौरसेनी व मागधी या भाषांच्या बाबतीत आढळतो; म्हणून (येथे तो नियम मी) सांगितलेला नाही. खरे म्हणजे, प्राकृतात--ऋतु:....दुइओ, इत्यादि प्रयोग होतात पण उद्, रयद इत्यादि प्रयोग मात्र होत नाहीत. क्वचित् (त चा द झालेले प्रयोग प्राकृतात) असले तरी सुद्धा ते 'व्यत्ययश्च' या (आमच्या व्याकरणातील) नियमाने सिद्ध होतात. (धृति शब्दापासून होणाऱ्या) दिही या (वर्णान्तरा) साठी मात्र ‘धृतेर्दिहिः' असे (वर्णान्तर) आम्ही सांगणार आहोतच.
(सूत्र) सप्ततौ रः ।। २१०।। (वृत्ति) सप्ततौ तस्य रो भवति। सत्तरी। (अनु.) सप्तति या शब्दात त चा र होतो. उदा. सत्तरी.
(सूत्र) अतसी-सातवाहने लः ।। २११।। (वृत्ति) अनयोस्तस्य लो भवति। अलसी। सालाहणो सालवाहणो। सालाहणी
भासा। (अनु.) अतसी आणि सातवाहन या दोन शब्दांत त चा ल होतो. उदा.
अलसी....भासा.
१ ऋतु, रजत.
२ सातवाहनी भाषा।