________________
प्राकृत व्याकरणे
१०७
ड होत नाही. उदा.) प्रतिसमयम्....पइण्णा. (क्रमाने संस्कृत शब्द असे:-) प्रति....मृतक, इत्यादि.
(सूत्र) इत्वे वेतसे ।। २०७।। (वृत्ति) वेतसे तस्य डो भवति इत्वे सति। वेडिसो। इत्व इति किम्।
वेअसो। इ: स्वप्नादौ (१.४६) इति इकारो न भवति इत्व इति
व्यावृत्तिबलात्। (अनु.) वेतस या शब्दात (त मधील अ चा) इ झाला असताना त चा ड होतो.
उदा. वेडिसो. इ झाला असता असे का म्हटले आहे ? (कारण असा इ झाला नसताना, त चा ड होत नाही. उदा.) वेअसो. (प्रस्तुत सूत्रात) इत्व झाले असता हे जे शब्द आहेत त्यांच्या व्यावृत्ति करण्याच्या सामर्थ्यामुळे वेअस या वर्णान्तरात ‘इ: स्वप्नादौ' सूत्राने (अ चा) इ होत नाही.
(सूत्र) गर्भितातिमुक्तके णः ।। २०८।। (वृत्ति) अनयोस्तस्य णो भवति। गम्भिणो। अणिउँतयं। क्वचिन्न भवत्यपि।
अइमुत्तयं। कथम् एरावणो। ऐरावणशब्दस्य। एरावओ इति तु
ऐरावतस्य। (अनु.) गर्भित आणि अतिमुक्तक या दोन शब्दांत त चा ण होतो. उदा.
गब्भिणो...उँतयं. क्वचित् (असा त चा ण) होतही नाही. उदा. अइमुत्तयं. एरावण हा शब्द कसा सिद्ध होतो ? (ऐरावत शब्दात त चा ण होऊन सिद्ध होत नाही काय? उत्तर-) (एरावण हे रूप) ऐरावण या शब्दाचे आहे.
परंतु एरावओ हे (वर्णान्तर) मात्र ऐरावत शब्दाचे आहे. (सूत्र) रुदिते दिना ण्ण: ।। २०९।। (वृत्ति) रुदिते दिना सह तस्य द्विरुक्तो णो भवति। रुण्णं। अत्र केचिद्
ऋत्वादिषु द इत्यारब्धवन्तः स तु शौरसेनीमागधीविषय एव दृश्यते इति नोच्यते। प्राकृते हि। ऋतुः रिऊ उऊ। रजतं रययं। एतद् एअं। गत: गओ। आगतः आगओ। साम्प्रतं संपयं। यतः जओ। ततः तओ। कृतं कयं। हतं हयं। हताश: हयासो। श्रुत: सुओ। आकृति: