________________
१०४
( सूत्र ) सटा - शकट - कैटभे ढः ।। १९६ ।।
( वृत्ति) एषु टस्य ढो भवति । सढा । सयढो । केढवो।
(अनु.) सटा, शकट आणि कैटभ या शब्दांत ट चा ढ होतो. उदा. सढा... केढवो.
( सूत्र ) स्फटिके लः ।। १९७।।
(वृत्ति) स्फटिके टस्य लो भवति। फलिहो। (अनु.) स्फटिक या शब्दात ट चा ल होतो.
प्रथमः पादः
उदा. फलिहो.
( सूत्र ) चपेटा - पाटौ वा ।। १९८।।
(वृत्ति) चपेटाशब्दे ण्यन्ते च पटिधातौ टस्य लो वा भवति । चविला चविडा । फाड़ फाडे ।
(अनु.) चपेटा या शब्दात आणि प्रयोजक प्रत्ययान्त पट् धातूमध्ये ट चाल विकल्पाने होतो. उदा. चविला...फाडेइ.
( सूत्र ) ठो ढः ।। १९९।।
( वृत्ति) स्वरात्परस्यासंयुक्तस्यानादेष्ठस्य ढो भवति । मढो । सढो । कमढो । कुढारो। पढइ। स्वरादित्येव। वेकुंठो'। असंयुक्तस्येत्येव। चिट्ठइ । अनादेरित्येव। हिअए ठाइ ।
(अनु.) स्वरापुढे असणाऱ्या, असंयुक्त, अनादि अशा ठ चा ढ होतो. उदा. मढो...पढइ. स्वरापुढे असतानाच (ठ चा ढ होतो; मागे अनुस्वार असल्यास ठ चा ढ होत नाही. उदा.) वेकुंठो. असंयुक्त असतानाच (ठ चा ढ होतो; संयुक्त असल्यास होत नाही. उदा.) चिट्ठइ. अनादि असतानाच (ठ चा ढ होतो; आदि असल्यास होत नाही. उदा.) हिअए ठाइ ।
१ क्रमाने :- मठ, शठ, कमठ, कुठार, पठति. २ वैकुण्ठ ३ तिष्ठति ४ हृदये तिष्ठति। हेमचंद्राच्या मते, चिट्ठ आणि ठा हे स्था धातूचे आदेश आहेत (४.१६).