________________
प्राकृत व्याकरणे
१०३
(अनु.) दुर्भग आणि सुभग या दोन शब्दांत (आदि उकारा चा) ऊ झाला असताना
ग चा व होतो. उदा. दूहवो, सूहवो. ऊ झाला असता असे का म्हटले आहे ? (कारण या शब्दांत जर उ चा ऊ झाला नसेल तर ग चा व होत नाही. उदा.) दुहओ, सुहओ.
(सूत्र) खचित-पिशाचयोश्च: सल्लौ वा ।। १९३।। (वृत्ति) अनयोश्चस्य यथासंख्यं स ल इत्यादेशौ वा भवतः। खसिओ खइओ।
पिसल्लो पिसाओ। (अनु.) खचित आणि पिशाच या दोन शब्दांत च चे अनुक्रमे स आणि ल्ल असे
आदेश विकल्पाने होतात. उदा. खसिओ...पिसाओ.
(सूत्र) जटिले जो झो वा ।। १९४।। (वृत्ति) जटिले जस्य झो वा भवति। झडिलो जडिलो। (अनु.) जटिल या शब्दात ज चा झ विकल्पाने होतो. उदा. झडिलो, जडिलो.
(सूत्र) टो डः ।। १९५।। (वृत्ति) स्वरात्परस्यासंयुक्तस्यानादेष्टस्य डो भवति। नडो । भडो। घडो। घडइ।
स्वरादित्येव। घंटा। असंयुक्तस्येत्येव। खट्टा। अनादेरित्येव। टक्को।
क्वचिन्न भवति। अटति अटइ। (अनु.) स्वरापुढे असणाऱ्या, असंयुक्त, अनादि अशा ट चा ड होतो. उदा.
नडो...घडइ. स्वरापुढे असतानाच (ट चा ड होतो; मागे अनुस्वार असल्यास, असे वर्णान्तर होत नाही. उदा.) घंटा. असंयुक्त असतानाच (ट चा ड होतो; संयुक्त असल्यास होत नाही. उदा.) खट्टा. अनादि असतानाच (ट चा ड होतो; ट आदि असल्यास, त्याचा ड होत नाही. उदा.) टक्को. क्वचित् (ट चा ड) होत नाही. उदा. अटति अटइ.
१
नट, भट, घट, घटति.
२ खट्वा
३
३
टक्क