________________
प्राकृत व्याकरणे
गया। नयणं। दयालू। लायण्णं। अवर्ण इति किम् ? सउणो। पउणो। परं। राईवं। निहओ। निनओ। वाऊ। कई।
अवर्णादित्येव। लोअस्स। देअरो। क्चचिद् भवति। पियइ३। (अनु.) कगचज' इत्यादि सूत्राने (क् ग्, इत्यादींचा) लोप झाला असता, उरलेला
अ-वर्ण हा अ-वर्णाच्या पुढे असल्यास लघु प्रयत्नाने उच्चारलेल्या य प्रमाणे (त्या अवर्णाची) श्रुति होते (म्हणजे लघु प्रयत्नाने उच्चारलेल्या य प्रमाणे तो अवर्ण ऐकू येतो). उदा. तित्थयरो...लायण्णं. अवर्ण असे का म्हटले आहे ? (कारण क् ग, इत्यादींच्या लोपानंतर उरलेला अवर्ण नसेल तर त्याची यश्रुति होत नाही. उदा.) सउणो...कई. अवर्णापुढे असतानाच (शेष अवर्णाची यश्रुति होते. मागे अवर्ण नसल्यास प्रायः यश्रुति होत नाही. उदा.) लोअस्स, देअरो. क्वचित् (मागे अवर्ण नसतानाही शेष अवर्णाची यश्रुति होते. उदा.) पियइ।
(सूत्र) कुब्ज-कर्पर-कीले कः खोपुष्पे ।। १८१।। (वृत्ति) एषु कस्य खो भवति पुष्पं चेत् कुब्जाभिधेयं न भवति। खुजो।
खप्परं। खीलओ। अपुष्प इति किम्। बंधेउं कुज्जयपसूण।
आर्षेऽन्यत्रापि। कासितं। खासि। कसितं। खसि। (अनु.) कुब्ज, कर्पर, कील या शब्दांत क चा ख होतो; कुब्ज या नावाचे फूल
असा अर्थ असेल तर कुब्ज शब्दात (क चा ख) होत नाही. उदा. खुजो...खीलओ. (कुब्ज शब्दाचा अर्थ) फूल नसताना (क चा ख होतो) असे का म्हटले आहे ? (कारण कुब्ज शब्दाचा अर्थ त्या नावाचे फूल असा असताना क चा ख होत नाही. उदा. ) बंधेउं... पसूणं. आर्ष प्राकृतात इतरत्रही (= इतर काही शब्दांतही) (क चा ख होतो. उदा. ) कासितं...खसिअं.
१ क्रमाने:- शकुनि (शकुन), प्रगुण, प्रचुर, राजीव, निहत, निनत (नि+नत),
वायु, कवि (कपि)। २ लोकस्य। देवरः। ३ पिबति। ४ बद्ध्वा कुब्जकप्रसूनम्।