________________
९८
अर्धमागधी व्याकरण
(३) ल्म=म्म : गुल्म =गुम्म (झाडी), वल्मीक = वम्मिय (वारूळ),
कुल्माष कुम्मास (उडीद)
९६ ऊष्म+ ऊष्म
ऊष्मवर्ण हे परस्परात समानबली असल्याने प्रथमस्थानीय ऊष्माचा लोप होऊन द्वितीयस्थानीय ऊष्माचें द्वित्व होते. (१) श्श-स्स : निश्शरण=निस्सरण, दुश्शासन=दुस्सासण, दुश्शील दुस्सील. (२) ष्ष-स्स : निष्षिक्त निस्सित्त (३) स्सस्स : निस्सह, दुस्सह
९७ ऊष्म+अंतस्थ
कमी बलवान् अंतस्थाचा लोप होऊन अधिकबल असणाऱ्या ऊष्माचे द्वित्व होते.
(अ) श्+अंतस्थ : (१) श्श=स्स : अवश्य= अवस्स, वैश्य वइस्स, नश्यतिनस्सइ (२) श्र३=स्स : मिश्र=मिस्स, विश्रम्भ विस्संभ (विश्वास) (३) श्ल=स्स : श्लाघ्य=सग्घ, श्लक्ष्ण=सण्ह (सूक्ष्म सुंदर) (४) श्व५=स्स : विश्व विस्स, विश्वास विस्सास.
(आ) +अंतस्थ : (१) ष्य=स्स : मनुष्य मणुस्स, आरुष्य=आरुस्स (रागाने), शिष्य=सिस्स, १ येथील परिणामी द्वित्व हे नेहमीच स्स असते. २ येथीलही परिणामी द्वित्व हे नेहमीच स्स असते. ३ आद्य संयुक्तव्यंजनात : श्रेष्ठ=सेट्ट, श्रेष्ठिन् सेट्टि, श्रम सम. ४ श्ल मध्ये कधी कधी ऊष्माचा लोप होतोः श्लिष्यन्ते=लिस्संति (चिकटवले
जातात) ५ आद्य संयुक्तव्यंजनात : श्वापद-सावय