________________
प्रकरण ६ : संयुक्तव्यंजन-विकार
९७
(३) म्य=म्म : सौम्य सोम्म, रम्य रम्म, सम्यक् सम्म (आ) (१) म्र=म्म : नम्रता= नम्मया
(२) म्ल=म्म : म्लेच्छ मेच्छ टीप : कधी कधी म्र व म्ल यांचा म्ब होतो? (१) म्र=म्ब : आम्र=अंब, ताम्र-तंब, आताम्र=आयंब, आम्रातक= अंबाडग
(वनस्पतीविशेष) (२) म्ल=म्ब : आम्ल अंब (इ) न्वन्न : अन्वेषण अन्नेसण
टीप : न्न व ण्ण लिहिण्या बद्दल :
वररुचि वगैरे प्राकृत वैयाकरण सर्वत्र ‘ण्ण' लिहावा असे म्हणतात; तर हेमचंद्र, इत्यादि व्याकरणकार 'न' व 'पण' दोन्ही लाही परवानगी देतात. तेव्हा सोईसाठी किंवा एकरूपतेसाठी याकोबीने म्हटल्याप्रमाणे, मूळ संस्कृत शब्दात 'ण' असल्यास वर्णान्तरांत ‘ण्ण' लिहावा; इतर ठिकाणी 'न' चा उपयोग करावा.३
९५ अंतस्थ+अनुनासिक
कमी बलवान् अंतस्थाचा लोप होऊन अधिक बलशाली अनुनासिकाचे द्वित्व होते. (१) f=ण्ण : सुवर्ण =सुवण्ण, पूर्ण=पुण्ण, चूर्ण=चुण्ण, कर्ण=कण्ण,
पर्णपण्ण, वर्ण=वण्ण (म. : वाण) (२) र्म=म्म : धर्म-धम्म, निर्मानुष=निम्माणुस, शर्मन् सम्म (सुख,कल्याण),
कर्मन्=कम्म.
१ म. : आम्र-आंबा, ताम्र-तांबे (रा), आम्ल-आंब (ट), आम्रातक
अंबाडा. २ ज्ञ (ज+न) च्या वर्णान्तरांत ण्ण वा न विकल्पाने वापरावा, असे प्रा.गांधी
(प्र.४७) यांचे मत आहे. ३ जैन हस्तलिखिते न व ण्ण यांचा हवा तसा उपयोग करतात.