________________
अर्धमागधी व्याकरण
या नवीन आलेल्या व्यंजनाचे द्वित्व' झालेले आढळते. (त्यथ्यद्यां चछजाः । ध्यह्योझः। प्रा.प्र. ३.२७-२८) (१) त्य=च्च : सत्य-सच्च, नित्य=निच्च, प्रत्यय पच्चय, कृत्य=किच्च
अत्यन्त=अच्चंत, आदित्य=आइच्च, मृत्यु =मच्चु, अपत्य=अवच्च,
अमात्यअमच्च, भृत्य=भिच्च (सेवक), आधिपत्य आहेवच्च. (२) थ्य३ = च्छ : पथ्य पच्छ, मिथ्या मिच्छा, नेपथ्य-नेवच्छ (३) द्य=ज : अद्य =अज, मद्य =मज्ज, वैद्य = वेज, विद्या विजा;
उद्यान=उज्जाण, उद्यत=उज्जय, उद्योत=उज्जोय (प्रकाश) (४) ध्य =ज्झ : मध्य =मज्झ, वध्य = वज्झ, अयोध्या = अओज्झा,
अमेध्य अमेज्झ (अशुचि), असाध्य=असज्झ, उपाध्याय उवज्झाय,
स्वाध्याय सज्झाय, अध्यवसाय अज्झवसाय. (आ) स्पर्श+र : (१) क्र=क्क : तक्र-तक्क (म.. ताक), चक्र-चक्क (म.:चाक), विक्रम विक्कम,
शक्र=सक्क (इंद्र) (२) ग्र=ग्ग : उग्र उग्ग, न्यग्रोध नग्गोह (वृक्षविशेष),
अग्र=अग्ग, समग्र=समग्ग. (३) घ्र ग्घ : व्याघ्र वग्घ (म.:वाघ), शीघ्र सिग्घ (४) च् =च्छ : कृच्छ्र=किच्छ (संकट)
१ म. : सत्य-साच, नृत्यति-नाचतो; उत्पद्यते-उपजतो, अद्य-आज; वंध्या
वांझ, संध्या-सांज, मध्य-माज (घर) २ त्य=च्च याचे अपवाद : प्रत्येक पत्तेय, प्रत्येक बुध्द=पत्तेय बुध्द, चैत्य=चइत्त
(जिनमंदिर) ३ श्य=च्छ चे अपवाद : पथ्य पत्थ, नेपथ्य-नेवत्थ (नायासं; पृ.
१९,२१) कधी तथ्य चे ‘तच्च' असेहि वर्णान्तर होते. ४ मागे अनुस्वार असल्यास द्वित्वातील पहिल्या व्यंजनाचा लोप होतो
विद्य=विंझ, संध्या संझा. ५ अनुस्वारागम झाल्यास : वक्र वंक (म. : बाक, वाकडा)