________________
९०
९० ऊष्म + स्पर्श
स्पर्श हे ऊष्मापेक्षा बलवान् असल्याने ऊष्माचा लोप होऊन स्पर्शाचे द्वित्व
होते.
(अ) श्+स्पर्श : श्च=च्छ : आश्चर्य=अच्छेर, पश्चात्=पच्छा, पश्चिम=पच्छिम, निश्चय=निच्छय, प्रायश्चित्त=पायच्छित्त.
:
(आ) ष्+स्पर्श : (१) ष्ठ=ट्ठ : काष्ठ=कट्ठ, गोष्टी=गोट्ठी ( सभा, समाज), सुष्ठु =सुटु, श्रेष्ठ=सेट्ठ, श्रेष्ठिन्=सेट्ठि
( २ ) ष्फ = प्फ : निष्फल=निप्फल.
(३) ष्क=क्ख: पुष्कर = पोक्खर (कमळ), निष्क= निक्ख (एकप्रकारचे नाणे ), पुष्करिणी= पोक्खरिणी (तळे)
अर्धमागधी व्याकरण
(४) ष्ट=ट्ठ : दुष्ट=दुट्ठ, दृष्टि = दिट्ठि, इष्ट = इट्ठ, मुष्टि = मुट्ठि, विष्टि = वेट्ठि (म : वेठ), तुष्ट=तुट्ठ.
(५) ष्प े=प्फ : पुष्प = पुप्फ, निष्पन्न=निप्पन्न, निष्पन्द=निप्फंद.
(इ) स्+स्पर्श : (१) स्ख = क्ख : प्रस्खलित = पक्खलिय, अस्खलित= अक्खलिय
प्रस्थित=पत्थिय, अगारस्थ=अगारत्थ.
(२) स्थ=त्थ : अवस्था=अवत्था, (३) स्फ=प्फ : प्रस्फुरति=पप्फुरइ.
( ४ ) स्क = क्ख : तिरस्कार=तिरक्खार, अमनस्क=अमणक्ख
(५) स्त=त्थ : हस्त = हत्थ, हस्तिन् =हत्थि ( हिंदी - हाथी), अस्ति=अत्थि (म: आथी), प्रशस्त =पसत्थ, वस्तु=वत्थु, मस्तक = मत्थय ( म. : माथा ) टीप : पुष्कळ शब्दांत क् च् ट् त् प् यांचे द्वित्व क्क् च्च् ट्व त्त् प्प् असेच होते. उदा.
२
३
संयुक्त व्यंजनांतील प्रथम अवयव ऊष्म हा लुप्त झाल्यावर उरलेल व्यंजने क् च् ट् त् प् ही उसतील तर त्याचे द्वित्व कधी क्खु, च्छ्, ट्ठ, त्थ्, प्फ् असे होते ; तर केव्हा नेहमीप्रमाणे क्क्, च्च्, व, त्त्, प्पू, असे होते.
सुलभीकरण झाल्यास : बाष्प- (बप्फ) - बाह ( संस्कृति = संखडि ( ओदनपाक)
मागे अनुस्वार असल्यास द्वित्वांतील पहिल्या व्यंजनाचा लोप होतो.