________________
८८
अर्धमागधी व्याकरण
: सद्भाव=सब्भाव, उद्भव = उब्भव, उद्भिन्न=उब्भिन्न (२४) प्त=त : सुप्त = सुत्त, दीप्त = दित्त, समाप्ति = समत्ति (२५) ब्ज=ज्ज : कुब्ज-खुज्ज, कुब्जा=खुज्जा (२६) ब्द=द्द : शब्द =सद्द (२७) ब्ध=द्ध : आरब्ध=आरद्ध, लब्ध=लद्ध.
८८ स्पर्श + अनुनासिक
स्पर्श हे अनुनासिकाहून अधिक बलवान् असल्याने अनुनासिकाचा लोप होऊन स्पर्शाचे द्वित्व होते.
(१) स्पर्श+ण : रुग्ण रुग्ग
(२) स्पर्श+न : नग्न' =नग्ग, अग्नि=अग्गि, सपत्नी = सवत्ती, पत्नी=पत्ती, विघ्न=विग्घ, प्राप्नोति = पप्पोइ, भग्न =भग्ग, यत्न=जत्त
(३) स्पर्श+म : आत्मन्=अत्त, आत्मजा=अत्तया, युग्म=जुग्ग, आत्मज=अत्तय. अपवाद : (अ) अर्धमागधीत 'ज्ञ' (ज्+न्+अ) चा प्रायः न्न (ण्ण) २ होतो. उदा. यज्ञ=जन्न, मनोज =मणुन्न, विज्ञान = विन्नाण, प्रतिज्ञा = पइन्ना, प्रज्ञापना=पण्णवणा (एक जैनागम ग्रंथ )
(आ) द्म=म्म : पद्म=पोम्म, छद्म=छम्म
(इ) क्म=प्प : रुक्मिणी=रुप्पिणी, रुक्म=रुप्प (सोने), रुक्मिन्=रुप्पि (ई) त्म=प्प : आत्मन्=अप्प, अध्यात्म=अज्झप्प, दुरात्मा=दुरप्पा ग्म=म्म : युग्म=जुम्म (जोडी), तिग्म = तिम्म ( तीक्ष्ण, उग्र)
८९ स्पर्श + ऊष्म
स्पर्श+उष्म या संयोगाचे पुढीलप्रमाणे समानीकरण होते : (अ) त्स४=च्छ : संवत्सर = संवच्छर, बीभत्स = बीभच्छ, वत्स=वच्छ,
अनुस्वारागमाने : हिंदीत: नग्न=नंगा.
२
ज्ञ च्या विकारांत ‘ण्ण' व 'न्न' विकल्पाने वापरावेत, उसे प्रा. गांधी (पृ. ४७) म्हणतात.
या संयोगात समानीकरणाचा नियम सर्वांशी लागत नाही.
अनुस्वागराम झाल्यास द्वित्वातील पहिल्या अवयवाचा लोप होतो. उदा विचिकित्सा=वितिगिंछा, जिघित्सा=दिगिंछा
४