________________
प्रकरण ६ : संयुक्तव्यंजन-विकार
८७
वरील २८ जोड्यांतून पुनरावृत्त होणाऱ्या - (१) स्पर्श+अनु° व (२) अनु +स्पर्श, (३) ऊष्म+स्पर्श व (४) स्पर्श+ऊष्म, (५) अनु° +ऊष्म आणि (६) ऊष्म+अनु° (७) स्पर्श+अंतस्थ आणि (८) अंतस्थ+स्पर्श, (९) अंतस्थ+अनु' व (१०) अनु +अंतस्थ, (११) ऊष्म+अंतस्थ व (१२) अंतस्थ+ऊष्म एकूण १२ जोड्या सोडल्यास फक्त १६ जोड्या उरतात. यांतील सर्वच जोड्यांना समानीकरणाचा नियम लागतो असे नाही. ज्या जोड्यांना समानीकरणाचा नियम लागतो त्याचा आता प्रथम विचार केला आहे.
८७ स्पर्श+स्पर्श
सर्व स्पर्श स्पर्श समानबली (परस्परात) असल्याने प्रथमस्थानीय स्पर्शाचा लोप होऊन, द्वितीयस्थानीय स्पर्शाचे द्वित्व होते.
(१) क्त=त्त : रक्त रत्त, भक्त भत्त, शक्ति सत्ति, भुक्त भत्त, मौक्तिक मोत्तिय. (२) क्थ=त्थ : रिक्थ=रित्थ (द्रव्य), सिक्थ=सित्थ (धान्यकण, घास) (३) क्प=प्प : वाक्पतिराज=वप्पइराअ (एक विशेषनाम) (४) ग्ध=द्ध : मुग्ध मुद्ध, दुग्ध दुद्ध (५) ग्भ ब्भ : प्राग्भारपब्भार (मोठा भार) (६) ट्क-क्क : षट्क छक्क, षट्काष्ठक-छक्कट्ठग (ओटा,देवडी) (७) ट्ख=क्ख : षटखण्ड-छक्खंड (८) ट्च =च्च : षट्च छच्च (९) ट्त=त्त : षट्तल छत्तल (१०) ट्प=प्प : षट्पद छप्पय (११) ट्फ=प्फ : कट्फल कप्फल (कायफळ) (१२) ड्ग=ग्ग : खड्ग खग्ग, षड्गुण छग्गुण (सहापट) (१३) ड्ज=ज्ज : षड्जीव छज्जीव (१४) ड्द=६ : षड्दिशं छद्दिसं, षड्दर्शन छइंसण (१५) ड्भ ब्भ : षड्भाग=छब्भाग, षड्भोग छब्भोग (१६) त्क=क्क : उत्कण्ठा=उक्कंठा, बलात्कार=बलक्कार, उत्कट=उक्कड (१७) त्ख=क्ख : उत्खात उक्खय (१८) त्प-प्प : उत्पल उप्पल, सत्पुरुष-सप्पुरिस, उत्पन्न उप्पन्न, तत्पर तप्पर (१९) त्फ=प्फ : उत्फुल्ल उप्फुल्ल (२०) द्ग=ग्ग : पुद्गल पोग्गल, उद्गम =उग्गम, मुद्गर=मोग्गर (२१) द्घ=ग्घ : उद्धृष्ट=उग्घुट्ठ (उद्घोषित), समुद्घात समुग्घाय (कर्मनिर्जराविशेष) (२२) बब्ब : बुद्बुद=बुब्बुय (बुडबुडा) (२३) भ=ब्भ १ अनुस्वारागम झाल्यास द्वित्वातील पहिल्या अवयवाचा लोप होतो.
सनत्कुमार=सणकुमार