________________
प्रकरण ६ : संयुक्तव्यंजन-विकार
अवयवाला स्व-समान करतो; अवयव समान बलाचे असता द्वितीय स्थानचा अवयव प्रथमस्थानीय अवयवाला आपल्या समान करतो. निराळ्या शब्दांत, संयुक्तव्यंजनाचे अवयव असमान बलाचे असता कमी बलवानाचा लोप होऊन उरलेल्या अधिक बलवान अवयवाचे द्वित्व होते; समानबली अवयव असता प्रथमस्थानीय अवयवाचा लोप होऊन द्वितीयस्थानीय अवयवाचे द्वित्व होते.
व्यंजनांचा बलक्रम उतरत्या क्रमाने असा आहे: (१) स्पर्शव्यंजने (प्रत्येक वर्गांतील पहिली चार व्यंजने) (२) अनुनासिके ? (३) ऊष्मवर्ण (४) ल् व् य् र् गणितांतील चिह्नांनी दाखवावयाचे म्हटल्यास स्पर्श > अनुनासिक > उष्म > ल् > व् > य् > र् किंवा र् < य् < व् < ल् < ऊष्म < अनुनासिक < स्पर्श.
८५
८५ द्वित्व कसे करावयाचे?
अर्धमागधीतील व्यंजनांची द्वित्वे पुढीलप्रमाणे होतात : (१) प्रत्येक वर्गातील पहिल्या व तिसऱ्या व्यंजनाचे स्वतःशीच संयोग होऊन द्वित्व होते. उदा. क्क, ग्ग, च्च, ज्ज, ट्ट, ड्ड; त्त, द्द, प्प, ब्ब. (२) प्रत्येक वर्गांतील दुसऱ्या व चौथ्या व्यंजनाचे द्वित्व आपल्याच वर्गातील अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या व्यंजनाशी संयोग होऊन होते. येथे पहिली व तिसरी व्यंजने प्रथम अवयवच असावी लागतात४. उदा. क्ख, ग्घ; च्छ, ज्झ; ट्ठ, ड्ढ; त्थ, द्ध; प्फ, ब्भ. (३) अनुनासिकापैकी ङ् व ञ् यांचे द्वित्व होत नाही. ण्, न्, म् यांचे स्वसंयोगाने ण्ण्, न्नू, म्म्, असे. द्वित्व होते. (४) स् या ऊष्माचे द्वित्व स्वसंयोगाने स्स् असे होते. (५) अंतस्थापैकी र् चे द्वित्व होत नाही; य् चे द्वित्व ज्ज् असे होते; ल्अ आणि व यांचे स्वसंयोगाने ल्लू आणि व्व् असे द्वित्व होते (६) महाप्राण ह् चे द्वित्व होत
नाही.
१ स्पर्शव्यंजने परस्परात समानबली असतात.
२ अनुनासिके परस्परात समानबली असतात.
३
संयुक्तव्यंजनात पहिला अवयव ऊष्म असून, त्याचा लोप होऊन उरलेले व्यंजन क् च् ट् त् प् यांतील एखादे असता, त्यांचे द्वित्व कधी क्ख, च्छ,
ट्ठ, त्थ, प्फ असे होते; तर कधी वरीलप्रमाणेच होते.
वर्गेषु युजः पूर्वः । प्रा. प्र. ३.५१
४