________________
अर्धमागधी व्याकरण
८३ समानीकरण
संस्कृतमधील जी संयुक्त व्यंजने अर्धमागधीत चालत नाहीत ती चालती करून घेताना - म्हणजे अर्धमागधीत चालू शकणाऱ्या एखाद्या संयुक्त व्यंजनासारखी करून घेताना - संयुक्त व्यंजनाच्या दोन अवयवांपैकी एक दुसऱ्या अवयवासमान केला जातो. म्हणजे त्यातील एक व्यंजन दुसऱ्याला आपल्यासारखे करते. यालाच समानीकरण म्हणतात. समानीकरण म्हणजे समान करणे संयुक्तव्यंजनातील एका व्यंजनाचे दुसऱ्याकडून समानीकरण होते म्हणजे ते व्यंजन दसऱ्याला आपल्यासमान, आपल्यासारखे, आपल्याला चालेल असे करते; त्याचे रूप बदलून त्याला आपल्याला चालेल असे रूप देते. हेच निराळ्या शब्दात सांगावयाचे झाल्यास, समानीकरणात कोणत्या तरी एका व्यंजनाचा लोप होऊन उरलेल्याचे द्वित्व होते.
___ या लोप पावणाऱ्या व्यंजनाच्या स्थानावरून समानीकरणाचे दोन प्रकार करता येतात : (१) जेव्हा पहिला अवयव लोप पावून दुसऱ्याचे द्वित्व होते, तेव्हा त्याला पूर्वगामी समानीकरण म्हणतात. उदा. भक्त=भ+क्+त्+अ = भ+ 0 +त्+अ = भ+त्त्+अ= भत्त ;रक्त रत्त. ___ (२) जेव्हा दुसरा अवयव लुप्त होऊन पहिल्याचे द्वित्व होते, तेव्हा त्याला पुरोगामी समानीकरण म्हणतात. उदा. पुत्र=पु+त्+र+अ = पु+त्+0+अ= पु+त्त्+अ= पुत्त; रम्य=रम्म.
८४ कोणत्या अवयवाचा लोप? कोणत्या अवयवाचे द्वित्व?
समानीकरणात संयुक्तव्यंजनातील एका अवयवाचा लोप होऊन उरलेल्याचे द्वित्व होते. आता, कोणत्या अवयवाचा लोप होऊन कोणत्या अवयवाचे द्वित्व होते, याबद्दल नियम असा आहे: अधिक बल. असलेला अवयव कमी बलाच्या
१ प्रथम द्वि-अवयवी संयुक्तव्यंजनांच्या विकारांचा विचार केला आहे. दोहोंपेक्षा
अधिक अवयवी जोडाक्षरांच्या समानीकरणाचा विचार पुढे केला आहे. २ हकार प्रथम असलेली जोडाक्षरे, अनुनासिक+स्पर्श, इत्यादि काही जोडाक्षरांचे
समानीकरण होत नाही. त्यांचा पुढे स्वतंत्र विचार केला आहे.