________________
प्रकरण ६ : संयुक्तव्यंजन-विकार
होऊन स्स् हे संयुक्तव्यंजन सिद्ध होते.
(४) ह् : महाप्राण ह् हा प्रथम अवयव असता इतर व्यंजनांशी त्याची होणारी जोडाक्षरे (उदा. ह्य, ह्व, ह्न, ह्र, ह्म, ह्ल, ह्र) अर्धमागधीत चालत' नाहीत. तसेच ह् चे द्वित्वही होत नसल्याने द्वित्वाने बनणारे ह् चे जोडाक्षर अर्धमागधीत नाही. २
८२ संयुक्तव्यंजनांचे विकार : भिन्न पद्धति
संस्कृतशब्दातील संयुक्तव्यंजने अर्धमागधीत घेतली जाताना परि. ८१ मध्ये सांगितलेल्या कोणत्यातरी प्रकारात बसण्यासारखी करून घेतली जातात. त्यासाठी प्राय: ‘समानीकरण' या पद्धतीचा उपयोग केला जातो. कधी, समानीकरण झाल्यावर होणाऱ्या द्वित्वातील एका अवयवाचा लोप करून (त्याचवेळी मागील स्वर ऱ्हस्व असल्यास तो दीर्घ करून) जोडाक्षराचेच उच्चाटन केले जाते (सुलभीकरण४) केव्हा, जोडाक्षरातील व्यंजनात एखादा जादा स्वर घालून जोडाक्षर नाहीसे करण्यात येते ( स्वरभक्ति ४) कधी, उच्चाराच्या सुलभतेसाठी शब्दातील पहिल्या जोडाक्षरामागे एखादा अधिक वर्ण उच्चारला जातो (आदिवर्णागम४).
तथापि संस्कृतमधील जोडाक्षरे अर्धमागधीत चालती करून घेण्याच्या दृष्टीने समानीकरण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचाच आता प्रथम विचार केला आहे.
१
२
३
८३
४
ण्ह (न्ह), म्ह, ल्ह, हीं हकारयुक्त व्यंजने अर्धमागधीत चालतात. अर्धमागधीत चालणाऱ्या जोडाक्षरासाठी परि. १५ पहा.
आता, प्रथम मध्य संयुक्तव्यंजनाचे विकार सांगितले आहेत. कारण तेच आद्य व अन्त्य संयुक्तव्यंजनांना बहुतांशी लागू पडतात. मग, आद्य व अन्त्य संयुक्तव्यंजन विकारांची माहिती दिली आहे.
सुलभीकरण, स्वरभक्ति, आदिवर्णागम यांचे माहितीसाठी 'भाषाशास्त्रीय वर्णादेश', प्रकरण ७ पहा.