________________
अर्धमागधी व्याकरण
८१ अर्धमागधीतील जोडाक्षरांची घटना (१) सवर्गीय व्यंजनांची खालीलप्रकारे सिद्ध झालेली जोडाक्षरेच अर्धमागधीत
चालतात, इतर नाही. (अ) प्रत्येक वर्गातील पहिल्या व तिसऱ्या व्यंजनाची जोडाक्षरे त्याचे द्वित्व
होऊन सिद्ध व्हावी लागतात : क्क, ग्ग; च्च, ज्ज; ट्ट, ड्ड; त्त, ६; प्प, ब्ब. (आ) प्रत्येक वर्गातील दुसऱ्या व चौथ्या व्यंजनाची जोडाक्षरे स्ववर्गातील अनुक्रमे
पहिल्या व तिसऱ्या व्यंजनाशी संयोग पावून सिद्ध व्हावी लागतात; त्यांतही पहिले व तिसरे व्यंजन हे प्रथम अवयवच असले पाहिजे. उदा.
क्ख, ग्घ ; च्छ, ज्झ; ?, ड्ड; त्थ, द्ध; प्फ, ब्भ. (इ) प्रत्येक वर्गातील पहिल्या चारही व्यंजनांचा स्ववर्गीय अनुनासिकाशी
संयोग होऊन जोडाक्षरे सिद्ध होतात; येथे ही अनुनासिक हे प्रथम अवयवच असले पाहिजे. उदा. ङ्क, ख, ङ्ग, ङ्घ; ञ्च, ञ्छ, ञ, झ; ण्ट,
ण्ठ, ण्ड, पढ; न्त, न्थ, न्द, न्ध; म्प, म्फ, म्ब, म्भ. (ई) ण, न, म् यांचे द्वित्व होऊन एण, न्न्, म्म् अशी संयुक्तव्यंजने सिद्ध होतात.
ङ् चे द्वित्व होत नाही. ञ् च्या द्वित्वाने बनलेले संयुक्तव्यंजन अर्धमागधीत चालत नाही. वरीलखेरीज इतर कोणत्याही प्रकाराने होणारी वर्गीय व्यंजनाची संयुक्त
व्यंजने अर्धमागधीत चालत नाहीत. (२) अंतस्थांची जोडाक्षरे : अंतस्थांची जोडाक्षरे पुढीलप्रमाणेच व्हावी लागतात:
(अ) ल आणि व् याचे द्वित्व होऊन. उदा. ल्लू , व्व्. (३) उष्माची जोडाक्षरे : स् हा एकच उष्मवर्ण अर्धमागधीत आहे. त्याचे द्वित्व
१
(अ) अंतस्थांचा परस्पर संयोग होऊन बनणारी उदा. ल्य, र्य, व्र, व्य) जोडाक्षरे अर्धमागधीत चालत नाहीत. (आ) र चे द्वित्व होत नसल्याने (रेफहकारयोर्द्वित्वं न भवति । हेम. २.९३) द्वित्व होऊन होणारे र चे जोडाक्षर अर्धमागधीत नाही. (इ) य् चे द्वित्व होऊन होणारे य्य् हे संयुक्त व्यंजन अर्धमागधीत चालत नाही. पण य् चा ज् होऊन य्य चा ज्ज होतो (घाटगे, पृ.५४ पहा).