________________
प्रकरण ६ : संयुक्तव्यंजन-विकार
८१
दोनच व्यंजने असतात; दोहोपेक्षा अधिक व्यंजने चालत नाहीत. (३) संस्कृतातील संयुक्त व्यंजने भिन्नभिन्न प्रकारची असू शकतात : सवर्गीय (एकाच वर्गातील व्यजनांची): उदा. उच्च, रज्जु, वञ्चित, मञ्जरी, बद्ध, चण्ड, कुट्टिम, कुक्कुट, तुच्छ, तुण्ड, सज्जन, चित्त, निमित्त, मन्दर, शङ्ख, पाप्मन् ; विवर्गीय (भिन्नवर्गीय व्यंजनांची): उदा. रुक्मिणी, अब्धि, शब्द; विजातीय (वर्गीय व्यंजने व इतर उष्म, अंतस्थ-व्यंजने यांच्या संयोगाने झालेली) उदा : शक्य, भास्कर, पुष्कर, मार्ग, तक्र, गुह्य, ब्रह्मन्, पक्व, कार्य, तीव्र, शल्य, मत्स्य, कष्ट, पक्ष, दृश्य, पक्ष्मन्); किंवा सजातीय (अंतस्थ व ऊष्म यांच्या द्वित्वाने बनलेली) उदा : वल्लभ, मल्लिका, निश्शरण, दुश्शासन, निष्षिक्त, इ. अर्धमागधीत विवर्गीय व विजातीय संयुक्त व्यंजने अजिबात चालत नाहीत; सवर्गीयापैकी काही विशिष्ट प्रकारांनी सिद्ध झालेली (उदा. त्त, क्क, च्च, ज, इ.) संयुक्त व्यंजने चालतात. सजातीय ही द्वित्वानेच होत असल्याने (उदा. ल्ल,व्व,स्स) ती अर्धमागधीत चालतात.
८० संयुक्तव्यंजन-विकारांचे स्वरूप
साहजिकच संस्कृत शब्दातील संयुक्त व्यंजने अर्धमागधीत येताना त्याच्यात पुढीलप्रमाणे विकार व्हावे लागतात : (१) दोहोपेक्षा अधिक अवयव असलेली संयुक्त व्यंजने द्वि-अवयवी केली जातात. (२) भिन्नवर्गीय व विजातीय संयुक्त व्यंजने अर्धमागधीत चालण्यासारखी करून घेतली जातात; सवर्गीयातही जी चालण्यासारखी नसतील ती चालण्यासारखी करून घ्यावी लागतात; सजातीयापैकी द्वित्वाने बनलेली ल्ल, व्व, स्स एवढीच अर्धमागधीत चालतात. (३) शब्दाचे आद्य व अन्त्य स्थानी अर्धमागधीत संयुक्तव्यंजन चालत नसल्याने त्यांनाही योग्य ते विकार व्हावे लागतात.
आता, संयुक्त व्यंजनांचे कसे व कोणते विकार होतात, हे पाहण्यापूर्वी अर्धमागधीतील संयुक्तव्यंजने कोणत्या विशिष्ट प्रकारांनी बनतात, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
१
याला अपवाद : वंद्र (समूह)