________________
प्रकरण ६
संयुक्तव्यंजन-विकार
SAVRSAIRERERERERERERERERERERERERERERERERERERERERERERER
७८ प्राथमिक
जेव्हा दोन (अगर अधिक) व्यंजने मध्ये व अन्ती स्वर न येता एकत्र येतात, तेव्हा संयुक्त व्यंजन होते. उदा. प्स्, क्रू, प्म्, त्र, त्स्न् इ. संयुक्त व्यंजनातील प्रत्येक व्यंजनाला त्या संयुक्त व्यंजनाचा अवयव म्हणावे. उदा. प्स् हे प् व स् या व्यंजनांनी बनले आहे; म्हणून प् व स् हे प्स् चे अवयव होत; तसेच त्स्न् चे अवयव त्, स्, न् हे होत.
संयुक्त व्यंजनात ज्या व्यंजनाचा उच्चार प्रथम होतो तो अवयव प्रथम होय; याच रीतीने अवयव द्वितीय (तृतीय असे) ठरतात. उदा. क्रू मध्ये क् चा उच्चार प्रथम, नंतर र् चा उच्चार; म्हणून क् हा प्रथम अवयव आणि र् हा दुसरा अवयव. त्स्न् मध्ये त् पहिला, स् दुसरा व न् तिसरा अवयव होय.
७९ संस्कृत व अर्धमागधी : संयुक्तव्यंजने : तौलनिक विचार
(१) संस्कृतमध्ये संयुक्तव्यंजन शब्दांच्या आद्य (उदा.स्कन्द, स्तम्भ), मध्य (उदा. चक्र, दर्प), व अन्त्य (उदा. तर्ज्, मस्ज्) स्थानी चालू शकते. अर्धमागधीत शब्दाच्या आद्य व अन्त्य स्थानी संयुक्तव्यंजन चालत नाही; फक्त मध्य स्थानी मात्र ते राहू शकते. (२) संस्कृत मधील संयुक्त व्यंजनात दोहोपेक्षा अधिक व्यंजने चालतात. उदा. क्त्य, क्ष्म, घ्न्य, च्छू (तीन अवयव); त्स्न्य, र्क्ष्य (चार अवयव); त्र्न्य (पाच अवयव) अर्धमागधीत मात्र संयुक्त व्यंजनात
१ संयुक्त व्यंजनात अन्ती स्वर मिळाला की संयुक्ताक्षर वा जोडाक्षर होते. उदा. प्स, त्र, क्रा, द्रु, प्नो, इ.