________________
प्रकरण ५ : असंयुक्त-व्यंजन-विकार
(४) विसर्गाच्या पूर्वी अ खेरीज इतर कोणताही स्वर असता विसर्गाचा लोप
होतो, व मागील स्वर ह्रस्व असल्यास तो दीर्घ होतो; मागील स्वर दीर्घ
असल्यास तो तसाच राहतो. (अ) मुनिः=मुणी, गुरुः गुरू (आ) देवाः= देवा, वधूः=वहू (५) काही क्रियाविशेषण अव्ययात अन्त्य विसर्गाचा अनुस्वार होतो.
__बहिः=बाहिं, मुहः=मुहं, प्रादुः=पाउं, अध:=अहं, पुर:=पुरं, प्रात:=पायं. (६) पुढील शब्दातील अन्त्य विसर्गाचे विकार विशिष्ट आहेत.
उच्चैः१=उच्चा, शनैः सणियं
१. याकोबी, (Erga), पृ. ३०