________________
७८
अर्धमागधी व्याकरण
७५ अत् प्रत्ययान्त व.का.धा.वि. आणि वत् मत् प्रत्ययान्त तकारान्त शब्द
अत् प्रत्ययान्त व.का.धा.वि., आणि मत् व वत् प्रत्ययान्त शब्द यांचे अंत, मंत, वंत होऊन ते स्वरान्त होतात.
जयंत (यतत्), अरहंत (अर्हत्), गच्छंत (गच्छत्), गायंत (गायत्), रक्खंत (रक्षत्); धीमंत (धीमत्); भगवंत (भगवत्)
७६ अन्ती असंयुक्त व्यंजन असणारे धातु
असंयुक्त व्यंजनान्त धातूत प्राय: अ हा स्वर मिळवून ते अकारान्त केले जातात.२
वम् वम, वस्=वस, वह वह, चल्=चल, चर्=चर. ७७ अन्त्य विसर्गाचे विकार
अन्त्य विसर्गाचे विविध विकार पुढीलप्रमाणे होतात: (१) अन्त्य विसर्गाच्या पूर्वी अ हा स्वर असल्यास, अवर्णासह विसर्गाचा ओ
होतो (अतो डो विसर्गस्य। हेम. १.३७). (अ) देवः=देवो, भवत:=भवओ, ततः=तओ, अत:=अओ, कुतः=कओ,
यतः=जओ, अन्तः=अंतो, प्रात:=पाओ, पुन:=पुणो. (आ) सर्वत३:=सव्वओ, अग्रत:=अग्गओ, मार्गत: मग्गओ, धर्मत: धम्मओ. (२) पूर्वी अ असूनही कधी कधी अवर्णासह विसर्गाचा ए होतो. (अ) पुरुषः= पुरिसे, देव:=देवे, न:=णे. (आ) काही क्रियाविशेषण अव्ययातही अवर्णासह विसर्गाचा ए होतो. अध:=अहे,
पुर:=पुरे, रह:-रहे, श्व:=सवे. (३) पूर्वी अ असूनही कधी कधी विसर्गाचा नुसता लोप होतो: पुन:=पुण, उण.
१ म. :- संत; श्रीमंत, हनुमंत; भगवंत, धणवंत. २ धातुसाधनिका, परि. १३४ पहा. ३ प्रायः तस् प्रत्ययान्त शब्दातील विसर्गाचा मागील अवर्णासह ओ होतो.