________________
प्रकरण ५ : असंयुक्त-व्यंजन - विकार
तद्=तं, यावत्=जावं, तावत् = तावं, युगपद् = जुगवं (एकदम ), असकृत्=असइं (वारंवार )
(अ) कधी कधी अन्त्य व्यंजनाचा उ होऊन, तो मागील 'अ' या स्वरांत मिळून ओ झालेला आढळतो.
पृथक्= पुढो, पुनर्=पुणो, अन्तर्=अंतो, अधस्=अहो.
७४ अन्त्य असंयुक्त व्यंजनात स्वर मिळविणे
असंयुक्त व्यंजनान्त नामात स्वर मिळवून ते स्वरान्त' केले जातात: पुल्लिंगी व नपुसकलिंगी नामात ‘अ', व स्त्रीलिंगी नामात 'आ' वा 'इ' हे स्वर मिळविले
७७
जातात.
(१) अ मिळविणे : शरद् = सरय, भिषज् = भिसय, प्रावृष्= पाउस, मरुत् = मरुय, धनुस्=धणुह, दीर्घायुस्= दीहाउस, साक्षिन् = सक्खिण, कृमिन्=किमिण, बर्हिन्=बरहिण, गर्भिन्=गब्भिण.
(२) आ मिळविणे ३ : सरित् = सरिया, सम्पद् = संपया, दिश्= दिसा, क्षुध्=छुहा, वाच्=वाया, धुर्=धुरा, ककुभ् = कउहा, चिरायुस् = चिराउसा, आशीस्=आसीसा, गिर्= गिरा, प्रतिपद्=पाडिवया, अप्सरस्=अच्छरसा, पुर्=पुरा.
(३) इ मिळविणे : दिश्४ = दिसि, आपद् = आवइ, विपद्=विवइ.
१
२
३
४
काही अन्नन्त शब्दात अन्त्य न् चा लोप करून व पुन: अन्ती 'आण' मिळवून ते स्वरान्त केलेले आढळतात: मूर्धन्= मुद्धाण, युवन्=जुवाण, श्वन्=साण, अध्वन्=अध्दाण.
म. :- शरद, पाउस, दंडवत (दंडवत्), आपण (आत्मन्)
म. :- सरिता, संपदा, दिशा, क्षुधा, वाचा, धुरा, गिरा, प्रतिपदा.
पा. स.म., पृ. ५७०