________________
प्रकरण ५ : असंयुक्त-व्यंजन-विकार
७५
आद्य मानून : सु-पुरुष सुपुरिस, राज-पुत्र रायउत्त, दिन-कर दिणयर. मध्य मानून :- सु-पुरूष सुउरिस, राज-पुत्र=रायउत्त, दिन-कर दिणयर,
आर्यपुत्र अजउत्त, तीर्थकर=तित्थयर, वन-चर=वणयर, स्व-जन= सयण, प्रजापती-पयावइ, धरणी-तल= धरणीयल. जल-धर= जलहर, मधु-कर = महुयर. (अ) मागे उपसर्ग असताही वरीलप्रमाणेच होते.
आद्य मानून : सुकृत सुकय, अनु-कम्पा = अणुकंपा मध्य मानून : अनुकूल अणुऊल, प्रतिपाल पडिवाल, परिजन परियण
७१ अन्त्य असंयुक्त व्यंजनांचे विकार
अर्धमागधीत व्यंजनान्त शब्द चालत नसल्याने असे संस्कृत शब्द व्यंजनान्त राहणार नाहीत, असे केले जाते. त्यासाठी मुख्यत: दोन पद्धतींचा अवलंब केला जातो : (१) अन्त्य व्यंजनाचा लोप करणे अथवा (२) अन्त्य व्यंजनात एखादा स्वर मिळवून ते स्वरान्त करणे.
या दोन मुख्य व इतर काही प्रकाराची माहिती पुढे दिली आहे.
७२ अन्त्य असंयुक्त व्यंजनाचा लोप
शब्दातील अन्त्य असंयुक्त व्यंजनाचा लोप केला जातो?. (अ) यावत्२=जाव, तावत्=ताव, पश्चात्=पच्छा, कदाचित्=कयाइ, भोस्=भो,
मनाक्म णा, समन्तात् समंता, धिक्=धी (आ) सुहृद्=सुहि, अंगविद्-अङ्गवि (अंगग्रंथ जाणणारा) (इ) तकारान्त् शब्दांच्या अन्त्य त् चा लोप३ :
जगत् = जग, विद्युत् विज्जु, परिषत्=परिसा, तडित्=तडि (वीज)
१ शब्दानां यद् अन्त्यव्यंजनं तस्य लुग् भवति। हेम १.११ २ येथे अव्ययातील अन्त्य व्यंजनाचा लोप झाला आहे. ३ म. :- जगत् -जग, विद्युत्-वीज.