________________
७०
अर्धमागधी व्याकरण
ताडन=तालेइ (मारतो), क्रीडन=कीलण (खेळणे), पीडा=पीला, क्रीडा,
कीला.
(अ) मध्य असंयुक्त ड् कधी कधी तसाच राहतो
निबिड, पीडिय (पीडित), नीड, गउड (गौड) (आ)मध्य असंयुक्त ड् चा कधी कधी र् होतो.
वैडूर्य-वेरुलिय, बिडाल=बिराल (मांजर), बिडाली=बिराली (मांजरी) ६४ मध्य असंयुक्त न्
मध्य असंयुक्त न् चा ण् होतो? (नो णः । हेम. १.२२८)
दान =दाण, तनय=तणय, आसन आसण, जिन=जिण, मान =माण, वनवण, कानन काणण, अनंत=अणंत, जनजण, यान=जाण (वाहन), दिन=दिण, पवन पवण, धन-धण, अनंग=अणंग; सेना=सेणा, अनाथ अणाह, अधुना=अहुणा (आता); मुनि=मुणि; रजनी रयणी, मेदिनी=मेइणी, इदानीम् =इयाणिं, जननी जणणी; अनुराग अणुराय, अनुकम्पा=अणुकंपा, जानु=जाणु, मनुज=मणुय; अनेक अणेग; विनोद=विणोय.
६५ मध्य असंयुक्त ब्
मध्य असंयुक्त ब् चे पुढीलप्रमाणे विविध विकार होतात. (अ) कधी कधी ब चा लोप होतो. उदा: अलाबु=अलाउ, लाउ(भोपळा) (आ) कधी कधी ब् चा भ् होतो. उदा: बिम्बिसार=भिंभिसार (इ) कधी कधी ब् चा म् होतो. उदा: कबन्धकमंध (धड) (ई) पुष्कळदा ब चा व् होतो (बो व : । हेम. १.२३७)
कबन्ध कवंध, क्लीब=किलीव (नपुंसक), शबर=सवर, स्तबकित=थवइय (गुच्छयुक्त), कबरी कवरी (केशपाश, वेणी) शबल सवल (चित्रविचित्र रंगाचे), शिबिर=सिविर, शिबिका=सिविया (पालखी)
(अ) तथापि हेमचंद्र आणखी असे म्हणतो की अर्धमागधीत मध्य असंयुक्त न् चा कधी ण होत नाही. उदा. अनिल, अनल इ. तथापि डॉ. वैद्यानी (पृ.१७) म्हटल्याप्रमाणे मध्य असंयुक्त न् चा ण् करणे हे अयोग्य नाही. (आ) म. :- (न्=ण) : पानीय-पाणी, कठिन-कढिण, स्वजन-सजणा.