________________
प्रकरण ५ : असंयुक्त-व्यंजन-विकार
६२ मध्य असंयुक्त ट् ठ्
(१) ट्=ड् : कट=कड (चटई), तट= तड, पट=पड, भट=भड, घट=घड, वट=वड, नट=नड, कूट-कूड (कोडे), पटल= पडल; जटाल=जडाल (जटा असलेला), जटा=जडा; कोटि = कोडि, कुटिल=कुडिल, कार्पटिक = कप्पडिय (कापडी); शाटी साडी (साडी), नटी =नडी;
कुटुम्ब=कुटुंब, पटु=पडु, कटुक=कडुय.
(अ) मध्य असंयुक्त ट् चा पुष्कळदा ल् होतो?.
मध्य असंयुक्त ट् व ठ् चे अनुक्रमे 'व ढ् होतात.
स्फटिक=फलिह, पिटक = पिलाग (पेटी), कटित्र=कलित्त (कंबरेचे चिलखत), चपेटा=चवेला, पाटयति = फालेइ (फाडतो), कर्कोट=कक्कोल ( शाकविशेष), तटाक = तलाग (तलाव)
(२) ठ्=ढ्३ : शठ=सढ, पठति = पढइ ( पढतो), पाठ = पाढ, पिठर = पिढर (भांडे, थाळी), पीठ=पीढ, पादपीठ = पायवीढ; कुठार = कुढार ( कुऱ्हाड) ; कठिन=कढिण
१
६९
६३ मध्य असंयुक्त ड्
मध्य असंयुक्त ड् चा प्राय: ल् होतो' (डो लः । हेम १.२०२ ) गवेडक=गवेलग (मेंढा), गुड = गुल (गूळ), निगड=निगल (बेडी), एडक=एलग (एडका), गरुड =गरुल, षडस्र = छलंस (सहा बाजू असलेले) षोडश= सोलस, आपीड = आवील ( तुरा), वडवा = वलवा (घोडी),
२
३
४
(अ) टो डः । हेम. १.१९५, व ठो ढः । हेम. १.१९९ (आ) म : (ट्=ड्):- तट-तड, कटक - कडे, वट-वड, शाटी - साडी, कुटज=कुडा, मर्कट=माकड, कर्पट = कापड, कीट = कीड, कपाट = कवाड, कटु = कडु,
घटक-घडा.
म : तटाक-तलाव
(अ) मध्य असंयुक्त ठ् चा कधी ह् होतो : कुठार = कुहाड, पिठर=पिहड. (आ) म : (ठ्=ढ्) : पठ्-पढणे, पीठिका - पिढी.
म : तडाग-तलाव, दाडिम (डालिम) डाळिंब, पीड्- पिळणे.