________________
प्रकरण ५ : असंयुक्त-व्यंजन-विकार
६३
म्हणतात. हा उद्धत स्वर अ किंवा आ असल्यास त्यांचा उच्चार लघुप्रयत्नाने उच्चारित 'य' सारखा होतो. असे हेमचंद्र सांगतो?. हीच यश्रुति.२ (१) २ : सकल : सयल, छेक=छेय (हुशार), नरक नरय ; भूमिका भूमिया,
गणिका=गणिया (वेश्या), सहकार=सहयार; कोकिल कोइल, लौकिक लोइय; आकीर्ण=आइण्ण (भरलेले); गोकुल गोउल (गाईंचा कळप), आकुल=आउल, नकुल नउल (मुंगूस); प्रकृतिपयइ,
प्राकृत-पायय, निकृति=नियडि (कपट, लबाडी) (अ) अर्धमागधीत पुष्कळदा मध्य असंयुक्त क् चा ग् होतो.४
फलक = फलग (फळी), आकर=आगर (खाण), एक एग, दारक दारग (मुलगा), लोक-लोग, चम्प=चंपग (चाफा), अलक=अलग (केस), वृक=वग (लांडगा), शाक-साग (भाजी); नासिका नासिगा (नाक); चिकित्सा तेगिच्छा; प्राकृत पागय, आकृति आगइ, अन्तकृत अंतगड
(त्याच जन्मात मुक्त झालेला), सूत्रकृत-सूयगड (एका जैनागमग्रंथाचे नाव) (२) ग् :- युगल जुयल (जोडी), मृग=मिय, अनुग=अणुय (सेवक), नगर=नयर,
नगरी=नयरी; मृगांक=मियंक, शृगाल=सियाल (कोल्हा); त्यागिन्चाइ (त्यागी), भगिनी भइणी; लगुड-लउड (सोटा), द्विगुण=दुउण (दुप्पट); उपगूढ=उवऊढ (आलिंगित).
१ कगचजेत्यादिना लुकि सति शेष: अवर्णः अवर्णात्परो लघुप्रयत्नतरयकारश्रुतिः
भवति। हेम. १.१८० क् ग् इत्यादींच्या पूर्वी अ, आ हे स्वर असता यश्रुति होते, असे हेमचंद्र म्हणतो. मार्कंडेयाच्या मते अ व इ या स्वरापुढेही यश्रुति होते. जैन हस्तलिखिते तर सर्वच स्वरापुढे यश्रुति लिहितात. याकोबीच्या मते (कल्पसूत्र, प्रस्ता, पृ.२०). लुप्त झालेल्या एका व्यंजनाचा अवशेष या दृष्टीने सर्व
स्वरापुढे यश्रुति लिहिणे, हे व्युत्पत्तिदृष्ट्या अधिक सुसंगत आहे. ३ हिंदी : रसिक-रसिया ४ म. :- सकल-सगळा, बक-बग(ळा), मुकुट-मुगुट, प्रकट-प्रगट, एकदा
एगदा. हिंदी : शाक-साग