________________
अर्धमागधी व्याकरण
(मध्य असंयुक्त व्यंजन विकार) मध्य असंयुक्त व्यंजनाचे नियमित व अनियमित विकार खाली सांगितल्याप्रमाणे होतात.
६० मध्य असंयुक्त क् ग् च् ज् त् द् प् य व्
मध्य असंयुक्त क् ग् च् ज् त् द् प् य् व् यांचा प्राय:२ लोप होतो; ही व्यंजने लुप्त झाल्यावर त्यांच्याशी संयुक्त असणारा जो स्वर उरतो त्याला 'उद्धृत स्वर
१
मध्य असंयुक्त क् ग् च् ज् त् द् प् य् व् याबद्दल अर्धमागधीत कधी कधी त् येतो (चोक्षी, पृ. २०-२१; पा.स.म., प्रस्ता; पृ. २८-२९; सुत्ता; खंड १ प्रस्ता, पृ. १९) उदा. आराधक आराहत, अतिग=अतित, नाराच=नारात, ओजस्=ओत, यदा=जता, सामायिक सामातिक, परिवार परिताल अशाप्रकारे डॉ. सेठ इत्यादींच्या मते अर्धमागधीत तश्रुति' आहे. (काही मुद्रित ग्रंथातही असा तश्रुतीचा वापर आढळतो) पण डॉ. वैद्य (पृ.१६) यांच्या मते ही तश्रुति अर्धमागधीत नाही. ती अर्धमागधीचे वैशिष्ट नसून जैन हस्तालिखित लेखकांचे वैशिष्टय आहे. डॉ. वैद्य पुढे म्हणतात की कोणत्याही प्राकृत - वैयाकरणाने 'तश्रुति' चा निर्देश केलेला नाही. म्हणून तश्रुति ही अनधिकृत, अव्याकरणीय (ungrammatical) म्हणून विरोध्य आहे. (पिशेलचे (इ. पृ. १५०) मतही तश्रुतीला अनुकूल दिसत नाही). हेमचंद्र हा स्वत: जैन होता आणि तो जैनागम व इतर प्राकृत वाङ्मय याशी सुपरिचित होता. तथापि हेमचंद्र तश्रुतीचा उल्लेख करत नाही याचा अर्थ असा की तश्रुति लिहिण्याची प्रथा हेमचंद्रानंतर प्रचारात आली असावी. कगचजतदपयवां प्रायो लोप: । प्रा. प्र.२.२ - प्रायो ग्रहणाद् यत्र श्रुतिसुखम् अस्ति तत्र न भवति एव। (प्रा.प्र.२.२ वरील भामहाची टीका) तसेच प्रायो ग्रहणतश्चात्र कैश्चित् प्राकृतको विदैः। यत्र नश्यति सौभाग्यं तत्र लोपो न मन्यते।। (मार्कं. २.२ पहा)