________________
अर्धमागधी व्याकरण
दशति=डसइ (चावतो), दहति=डहइ (जाळतो), दहर=डहर (लहान,तरुण), दण्ड=डंड (हिंदी डंडा), दम्भ डंभ, दग्ध=डड्ड, दह्यते=डज्झइ (जाळला जातो), दोहद=डोहल (डोहाळा).
५८ आद्य असंयुक्तव्यंजनांचे अनियमित विकार
इतर काही व्यंजने आद्य स्थानी असता त्यांच्यात कधी कधी विकार होतात. त्यांना अनियमित म्हणण्यास हरकत नाही. हे विकार पुढीलप्रमाणे आढळतात. क = ख१ : कुब्ज = खुज (खुजा, कुबडा), कील-खील (पाचर,मेख),
कंधरा खंधरा (मान,गळा), कसित खसिय (खोकला), किङ्किणी खिंखिणी (लहान घंटा), क्रीडा खेड्ड, कास खास
(खोकला) (हिंदी-खांसी). क = ग : कन्दुक=गेंदूय (चेंडू) (म : गेंद) क = च : किरात=चिलाय, किरातिका=चिलाइया क = त : कन्दुक=तिंदूस, किरीट=तिरीड
= घरे : गृह घर, गृहिणी-घरिणी च = त : चिकित्सा=तेइच्छा, चिकित्सक तिगिच्छग (वैद्य) च = य : च=य (आणि), चापि यावि (आणि सुद्धा) ज = झ : जूषित झूसिय (सेवित, क्षपित) = द : जुगुप्सा दुगुंछा, जिघत्सा=दिगिच्छा (खाण्याची इच्छा),
ज्योत्स्ना=दोसिणा (चांदणे) त = च : तिष्ठति=चिट्ठइ (उभा राहतो) द = ध : दुहितृ=धूया (मुलगी) ध = ढरे : ध्वाङ्क्ष=ढंक (पक्षीविशेष) न = ल : निम्ब लिंब (म. :- लिंब)
१ २ ३
म. :- कर्पर = खापर, कीलक खिळा म. :- गुच्छ-घोस, गर्गरिका-घागर, गृह-घर म. :- धवल - ढवळा