________________
५८
अर्धमागधी व्याकरण
(अ) श्= छ् : शरु=छरु (बाण), शाव = छाव (छावा), शिरा = छिरा, शेप = छेप्प (शेपूट).
(आ) ष्=छ् : षट्=छ (सहा), षट्पद = छप्पय (भ्रमर ), षडस्र = छलंस (सहा बाजू असलेला), षट्क = छक्क (सहांचा समुदाय), षड्जीव=छज्जीव, षट्शत=छस्सय (६००), षष्ठ = छट्ठ, षष्ठी = छट्ठी, षण्मास = छम्मास, षण्मुख=छम्मुह, षड्विंशति=छव्वीस.
(इ) स्=छ् : सुधा=छुहा (चुना ), सप्तपर्ण = छत्तिवण्ण (वृक्षविशेष)
५४
आद्य असंयुक्त य् चे विकार
आद्य असंयुक्त य् चा सामान्यतः ज् होतो. १
यम=जम; याग=जाग, याम = जाम ( प्रहर ), या =जा ( जाणे ) ; युग=जुग(जूं), युद्ध=जुद्ध; यूथ = जूह ( समुदाय, कळप ), यूप= जूव ( यज्ञस्तंभ) ; योग =जोग, योगिन्=जोगि, योध=जोह (योद्धा), यौवन=जोव्वण.
(अ) आद्य असंयुक्त य् च्या पूर्वी एखादा उपसर्ग असताही कधी कधी य् चा ज् होतो. २
संयोग=संजोग, संयम=संजम, संयुक्त=संजुत्त, संयुत = संजय, संयत = संजय ; अपयशस्=अवजस; वियुक्त = विजुत्त; कुयोनि = कुजोणि
(आ) यथा व यावत् ३ हे शब्द समासात प्रथमपदी असता त्याच्या आद्य य् चा कधी कधी ज् होतो, तर कधी त्याचा नुसता लोप होतो.
यथा :-(१) लोप व विकल्पाने ज् : यथासुखम्=अहासुहं, जहासुहं; यथाश्रुतम् = अहासुयं, जहासुयं.
(२) नुसता लोप :- यथाकृत=अहागड, यथाजात = अहाजाय, यथाछंद=अहाछंद, यथासूत्र=अहासुत्त, यथापर्याप्त=अहापज्जत्त. यावत् :-(१) लोप व विकल्पाने ज् : यावत्कथा = आवकहा, जावकहा. १ (अ) आदेर्यो जः । १ हेम १.२४५.
(आ) म. :- यादव=जाधव, योधपुर=जोधपुर, यात्रा=जत्रा. २ बहुलाधिकारात् सोपसर्गस्यानादेरपि । हेम. १.२४५
३ ‘यावत्' या शब्दाच्या काही रूपातही आद्य य् चा लोप होतो. उदा. आवंति।