________________
प्रकरण ५ असंयुक्त-व्यंजन-विकार
888888888888888888888888888888888888888888888888888888
(अ)
(आद्य असंयुक्तव्यंजनांचे विकार) आद्य असंयुक्तव्यंजनांचे नियमित व अनियमित विकार पुढे सांगितल्या प्रमाणे होतात. ५२ आद्य असंयुक्त श् व ष् यांचे विकार
आद्य असंयुक्त श् व ष् यांचा प्रायः स् होतो. श्=स्' : शम=सम (शांति), शरीर=सरीर, शर=सर (बाण), शरण=सरण; शङ्ख=संख, शङ्का=संका; शाला=साला (शाळा), शालि=सालि (साळी), शारीर=सारीर ; शिव=सिव, शिला=सिला; शील=सील, शीतल=सीयल ; शुद्ध=सुद्ध, शुभ सुभ, शुद्धि=सुद्धि; शूर=सूर, शूल-सूल (सूळ); शृङ्ग =सिंग; शैल=सेल, शैवल सेवल; शोभा सोहा,
शोभन=सोहण; शौंडीर=सोंडीर (गर्विष्ठ), शौच सोय. (आ) ष्=स् : षष्टि-सट्ठि (साठ), षण्ड संड (वृक्षसमूह), षोडश सोलस
(सोळा) ५३ आद्य असंयुक्त श् व ष् आणि स् यांचे अनियमित विकार
आद्य असंयुक्त श्,ष आणि स्रे यांचा कधी कधी छ होतो. १ म. :- श्वापद-सावज, शुण्डा-सोंड, शम्भु-सांब, शाल्मली-सांवरी,
शृङ्खला-साखळी. २ प्राय: आद्य असंयुक्त स् चा काही विकार होत नाही. उदा. सव्व (सर्व),
सयल (सकल), सर (सरस्) सरोवर, समीव (समीप).