________________
५६
असल्याने त्याखेरीज इतर संयुक्त व्यंजनात योग्य ते बदल होणे, हेही क्रमप्राप्तच ठरते. (५) याखेरीज आद्य व मध्य अशा काही असंयुक्त व्यंजनातही फरक पडतात. (६) आणि शेवटी, अर्धमागधीत असलेल्या काही विशिष्ट व्यंजनांचे जसे स्वरांचे तसे फेरफार होतात. हे फेरफार त्या त्या व्यंजनाच्या आद्य, मध्य वा अन्त्य स्थानानुसार होतात.
व्यंजनविकारातही काही विकार नियमितपणे तर काही अनियमितपणे होतात. हे सर्व व्यंजनविकार पुढीलप्रमाणे दाखविता येतील
:
व्यंजनविकारः (नियमित व अनियमित)
१
आद्य
असंयुक्तव्यंजन
मध्य
अन्त्य
अर्धमागधी व्याकरण
आद्य
संयुक्तव्यंजन
मध्य
या सर्व व्यंजनविकारांचा आता क्रमाने विचार केला आहे.
अन्त्य
विसर्ग हा स् वा र् चा विकार आहे. संस्कृत शब्दात तो मध्य (उदा. दुःख) किंवा अन्त्य (उदा. देव:, मनः) स्थानी असू शकतो. म्हणून विसर्गाचे विकार पुढे मध्य व अन्त्य व्यंजनविकारात अंतर्भूत केलेले आहेत.