________________
प्रकरण ४) व्यंजनविकार
888888888888888888888888888888888888888888888888888888
५१ व्यंजनविकार : सामान्य विचार
संस्कृतशब्द अर्धमागधीत येताना जसे त्यातील स्वरात विकार होतात, तसेच व्यंजनातही होतात. व्यंजने ही संयुक्त वा असंयुक्त असतील; त्यानुसार व्यंजनविकारांचे (१) असंयुक्त-व्यंजन-विकार व (२) संयुक्त-व्यंजन-विकार असे दोन मुख्य भाग पडतात.
ही संयुक्त वा असंयुक्त व्यंजने संस्कृत शब्दात (२) आद्य (२) मध्य अथवा (३) अन्त्य' स्थानी असू शकतात. उदा. कर, चन्द्र, सरित्, राजन्, स्कन्द, स्तम्भ, स्पन्द, भास्कर, अर्थ, रक्ष, मन्त्र, मार्ग इ.
आता, अर्धमागधीत शब्दाच्या अन्त्य स्थानी स्वररहित केवल व्यंजन चालत नसल्याने (१) अन्त्य असंयुक्त तसेच संयुक्त व्यंजनात विकार व्हावे लागतात. (२) आणखी, अर्धमागधीत शब्दाच्या आद्य स्थानी जोडाक्षर चालत नसल्याने त्यातही विकार होणे सयुक्तिक ठरते. (३) त्याचप्रमाणे, अर्धमागधीत जी व्यंजनेच - श्, ष् - नाहीत, ती ज्या शब्दात आहेत त्यातही विकार होणे साहजिकच आहे. (४) तसेच, काही ठराविक प्रकारची जोडाक्षरेच चालत १ आद्य, मध्य, अन्त्य स्थान ठरविणे: 'राम' शब्दातील वर्ण वेगळे केले तर
र् + आ + म् + अ असे होईल येथे र् चा उच्चार प्रथम म्हणून ते आद्य; अ हा शेवटी आहे म्हणून तो अन्त्य; या दोहोंमधील आ, म् हे वर्ण मध्य होत. सरित्' शब्दांत स् आद्य, त् अन्त्य, उरलेले मध्य निमन्त्र शब्दांत न्
आद्य न्व् अन्त्य, उरलेले मध्य. २ परि. १५ मधील जोडाक्षरांचा तक्ता पहा.