________________
प्रकरण ३१ : विरामचिह्न व लेखन वैशिष्ट्ये
४९१
इत्यादींचे - वर्णनात्मक परिच्छेद ‘वण्णओ। (विवाग. पृ. २) (२) चंदणपायवे नाम उज्जाणे होत्था । वण्णओ (विवाग. पृ. २)
२) जाव : पूर्वी येऊन गेलेले परिच्छेद पुनः एखाद्या पुढील स्थळी अभिप्रेत आहेत, हे दर्शविण्यास ‘जाव' चा उपयोग केला जातो. उदा.
परिसा निग्गया जाव पडिगया। (अंत २)
३) दोन ते सहा पर्यंतची संख्यावाचके : शब्दांची पुनरावृत्ती टाळण्यास दोन ते सहा पर्यंतच्या संख्यावाचकांचा पुढे सांगितल्याप्रमाणे उपयोग करण्यात येतो.
क) दोन : १) क्रियापदांच्या रूपानंतर २ आल्यास त्याच क्रियापदाचे ल्यबन्त निर्दिष्ट होते. कधी २ ता असेहि लिहिले जाते.
१) आपुच्छइ२। (विवाग. पृ. ६) (२) गिण्हाहि २ ममं उवणेहि। (विवाग पृ. ९५)
२) विशेषणापुढे वा क्रियाविशेषण अव्ययापुढे २ आल्यास दोनदा पुनरावृत्ती सूचित होते. १) पडिजागरमाणी २ (विवाग. पृ. ३) २) अईव २। (भग. ८) (३) उद्दाइत्ता२। (विवाग. पृ.११) (जन्मास येऊन)
३) कधी २ ने दोन समानार्थक वाक्यांश निर्दिष्ट होतात. तेणं कालेणं २। (= तेणं कालेणं तेणं समएणं।)
ख) तीन : ३ ने तीन समानार्थक शब्द वा तीन विशिष्ट शब्द निर्दिष्ट होतात. १) संताइ। (संता, तंता परितंता २) समणेणं ३।
(समणेणं भगवया महावीरेणं।) ग) चार : ४ ने चार समानार्थक' अथवा विशिष्ट शब्द सूचित होतात.
१) असणं ४। (असणं पाणं, खाइमं साइमं) २) आसाएमाणी ४। (आसा एमाणी, विसाएमाणी, परिभुजेमाणी, परिभाएमाणी) ३) सडइ ४। (सडइ, पडइ, गलइ, विद्धंसइ) ४) साडित्तए ४। (साडित्तए, पाडित्तए, गालित्तए, विद्धंसित्तए)
घ) पाच : १) ५ ने पांच समानार्थक१ किंवा विशिष्ट शब्द निर्दिष्ट होतात.
१) भीए५। (भीए, तत्थे, तसिए, उव्विग्गे, संजायभए) २) सिज्झिहिइ ५।(सिज्झिहिइ, बुज्झिहिइ, मुच्चिहिइ, परिनिव्वहिइ, सव्वदुक्खाणं भंत करे हिइ)
१
ज्यांचा नेहमीच असा वापर आढळतो असे.