________________
SALABRIAEREREREAERERERERERERERERERERERERERERERERERERER
प्रकरण ३१
विरामचिह्न व लेखन वैशिष्ट्ये
४४५ विरामचिह्ने
वाक्याची समाप्ती दाखविणारे दंड' (एक लहान उभी रेघ ) हे एकच विरामचिह्न अर्धमागधीत' आहे. तसेच एका दंडाने श्लोकार्ध समाप्ती व दोन दंडांनी श्लोकसमाप्ती दर्शविली जाते.
खेरीज, अर्धमागधीत काही शब्दच विरामचिह्नांचे कार्य करतात.
१) 'इति' ने अपरोक्ष विधानाची समाप्ती दर्शविली जाते. तर 'जहा' व 'एवं' हे शब्द अपरोक्ष विधानाचा आरंभ निर्दिष्ट करतात. २) 'किं' या प्रश्नार्थक सर्वनामाच्या एखाद्या रूपाने व प्रश्नार्थक अव्ययांनी वाक्य प्रश्नार्थक आहे, हे दर्शविले जाते. ३) केवलप्रयोगी अव्ययांच्या उपयोगाने वाक्य उद्गारवाची आहे, हे सूचित होते.
४४६ लेखन वैशिष्ट्ये :
अ) अर्धमागधी वाङ्ममयात शब्दांची काटकसर करण्यास पुढील मार्गांचा अवलंब केलेला आढळतो.
१) वण्णओ : दीर्घ ठराविक साच्याचे राजा, राणी, नगर, उद्यान,
१
२
३
४
हिंदी ही भाषा अशा दंडाचा उपयोग करते.
छापील पुस्तकांत आधुनिक संपादक आतां सर्रास इंग्रजीतून आलेल्या विरामचिह्नांचा उपयोग करताना आढळतात.
जुन्या मराठी पद्यांत दंडाचा उपयोग आढळतो.
वाक्यांत 'किं' चा उपयोग नसता वक्त्याच्या उच्चार पध्दतीवरूनहि वाक्य प्रश्नार्थक आहे, हे ठरविता येते.