________________
प्रकरण ३० : वाक्यातील शब्दक्रम व वाक्यक्रम
४८९
(१) न जुत्तो सयमारंभो कुमारस्स । जओ सो नीयतरो । ( कथा. पृ. १६१) कुमाराने स्वत:च प्रयत्न करणे योग्य नाही; कारण तो फार नीच आहे. (२) किमेयं तीरं उयाहु दीवं। (कथा. पृ. १४५) हा किनारा आहे की द्वीप आहे ? (३) सद्दहामि तुम्ह वयणं। किंतु एयं न सक्कुणोमि काउं । ( कथा. पृ.१३८). माझा तुमच्या वचनावर विश्वास आहे; परंतु हे करणे मला शक्य नाही.